गरजूंना तातडीने उपचार देण्याचा प्रयत्न : डॉ. आदिती कराड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:16+5:302021-06-29T04:08:16+5:30
डॉ. आदिती कराड रुग्णालये ही देशाची जीवनवाहिनी आहे. किरकोळ ते गंभीर आजारांपर्यंत गरजूंना तातडीने उपचार मिळवून देणे हे विश्वराज ...
डॉ. आदिती कराड
रुग्णालये ही देशाची जीवनवाहिनी आहे. किरकोळ ते गंभीर आजारांपर्यंत गरजूंना तातडीने उपचार मिळवून देणे हे विश्वराज रुग्णालयाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे रुग्णालयाच्या संचालक डॉ. आदिती कराड यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटातही या रुग्णालयाने वैद्यकीय गुणवत्ता राखली आहे. वैद्यकीय उपचारांसाठी रुग्ण आणि नातेवाइकांना कोणत्याही एका संस्थेवर विश्वास ठेवावा लागतो. रुग्णांमध्ये अशा प्रकारे विश्वास निर्माण करण्याचे कार्य लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयाने केल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.
रुग्णांचा विश्वास जिंकण्याबरोबरच त्याच प्रकारच्या उच्च सुविधा पुरवण्याचे कार्यही रुग्णालय व्यवस्थापन करत आहे. एमआयटी संस्थेच्या वतीने विश्वराज रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे. 'आमचे दरवाजे नेहमी सर्वांसाठी खुले असतात' हे तत्त्व विश्वराज रुग्णालयाने जपले आहे. एनएबीएच प्रमाणपत्र मिळवलेल्या या रुग्णालयाला उपचारांसाठी पूर्व पुण्यात राहणाऱ्यांकडून पसंती मिळत आहे. हृदयविकारावरील उपचारांपासून प्लास्टिक सर्जरीपर्यंतचे सर्व उपचार या रुग्णालयामध्ये केले जातात. अत्यावश्यक आैषधांपासून अतिदक्षता विभाग आणि मेंदूविकारांपासून ते मूत्रविकारापर्यंत सर्व प्रकारच्या उपचारांची सुविधा विश्वराज रुग्णालयात उपलब्ध आहे, असेही डॉ. आदिती कराड यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील नागरिकांना नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी विश्वराज रुग्णालयाकडे अत्यंत विश्वासाने पाहिले जात आहे. २०१६मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयात एकाच वेळी ३०० रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ज्ञांचे सुसज्ज पथक आणि रुग्णसेवेसाठी वचनबद्ध असलेले कर्मचारी ही या रुग्णालयाची वैशिष्ट्ये आहेत. हृदयविकार विज्ञान, गंभीर रुग्णांची देखभाल, पचनसंस्थेचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलाॅजी), मेंदूचे आजार, मूत्रपिंडासंबंधी आजार, कर्करोगावरील उपचार, सांध्यावरील उपचार यांसारख्या अनेक सुविधांनी विश्वराज रुग्णालय सुसज्ज आहे, असे डॉ. आदिती कराड यांनी सांगितले.
कोरोनाकाळातही विश्वराज रुग्णालयाने संसर्ग रोखण्यासाठी आघाडीवर राहून कार्य केले. नागरिकांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी टेलिफोन आणि व्हिडिओच्या माध्यमातून आवश्यक सूचना करण्यात येत आहेत. रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी पीपीई किट वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना विश्वराज रुग्णालयाने पाच हजार रुग्णांवर उपचार केले. त्याचप्रमाणे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष देण्यात आले. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढलेले असतानाही रुग्णालयाने अखंड रुग्णसेवा केली. कोरोनाकाळात सुमारे ३०० हृदयरुग्णांवर उपचार करण्यात आले आणि ४०० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारे अखंड रुग्णसेवेच्या माध्यमातून विश्वराज रुग्णालयाने विश्वासार्हता जपली आहे, असे डॉ. कराड यांनी सांगितले.
(विशेष मुलाखत)