बारामतीत पत्रकारांना लुटण्याचा प्रयत्न फसला

By admin | Published: September 23, 2015 03:31 AM2015-09-23T03:31:46+5:302015-09-23T03:31:46+5:30

‘ए गाडी बाजूला घे... धडक मारून पुढे जातोस... चल नुकसान भरून दे... गाडीतून खाली उतर ...’ असा बनाव रचून सोमवारी (दि. २२) रात्री १० वाजता कारमधील पत्रकारांनाच लुटण्याचा प्रयत्न टोळीने केला.

The attempt to rob a journalist in Baramati is unsuccessful | बारामतीत पत्रकारांना लुटण्याचा प्रयत्न फसला

बारामतीत पत्रकारांना लुटण्याचा प्रयत्न फसला

Next

बारामती : ‘ए गाडी बाजूला घे... धडक मारून पुढे जातोस... चल नुकसान भरून दे... गाडीतून खाली उतर ...’ असा बनाव रचून सोमवारी (दि. २२) रात्री १० वाजता कारमधील पत्रकारांनाच लुटण्याचा प्रयत्न टोळीने केला. पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ते पळून गेले. मात्र, बारामती शहरातील इंदापूर चौक ते इंदापूर रस्त्याच्या टोलनाक्यापर्यंत सायंकाळी सातनंतर गाड्या अडवून लुटणारी टोळी सक्रिय आहे. याच प्रकारे बनाव रचून ही टोळी अनेकांना लुटत असल्याची माहिती पुढे आली आहे.
‘लोकमत’ने यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करून बसस्थानक, रिंगरोडच्या परिसरात होत असलेल्या चोऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. मात्र, पोलिसांच्या हतबलतेचा फायदा घेऊन ही टोळी गाड्या अडवून वाटमारी करत आहेत.
येथील पत्रकार अमोल तोरणे यांच्यासह काही जण सोमवार (दि.२१) इंडिका कारमधून भवानीनगरच्या दिशेने निघाले होते. त्यांना हा अनुभव आला. सोमवारी रात्री बारामती-इंदापूर रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढे दुचाकीस्वाराने कारचा पाठलाग सुरू केला. हॉर्न वाजवतोय... ऐकू येत नाही का... अशी बतावणी करून त्याने सर्वांना दमबाजी सुरू केली. त्यानंतर याबाबत शहानिशा करण्यासाठी पत्रकारांनी कार रस्त्याच्या कडेला घेतली. या वेळी दुचाकीस्वाराने, ‘तुमच्या कारने माझ्या दुचाकीला धडक दिली आहे. त्यामध्ये माझ्या गाडीचे नुकसान झाले’ असे सांगून दमबाजी सुरूच ठेवली. या वेळी पत्रकार तोरणे यांनी दुचाकीचे निरीक्षण केले. तसेच, गाडीचा वेग नियंत्रित असल्याचे त्यांना माहिती होते. त्यामुळे बनाव रचून पैसे लुटण्याचा दुचाकीस्वाराचा डाव त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने मोबाईलवरून पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधला. काहीही घडले नसताना खोटे बोलून गाड्या अडवून लुटले जात असल्याची माहिती दिली.

Web Title: The attempt to rob a journalist in Baramati is unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.