हुतात्मा स्मारक परिसरातील वस्तूंची चोरी करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:14 AM2021-09-05T04:14:15+5:302021-09-05T04:14:15+5:30

परिसरामध्ये या ठिकाणी यापूर्वी चोरीच्या घटना घडलेल्या असून येथील साहित्यांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे. मात्र, नव्याने येथे चोरीचा ...

Attempt to steal items from the Martyrs Memorial area | हुतात्मा स्मारक परिसरातील वस्तूंची चोरी करण्याचा प्रयत्न

हुतात्मा स्मारक परिसरातील वस्तूंची चोरी करण्याचा प्रयत्न

Next

परिसरामध्ये या ठिकाणी यापूर्वी चोरीच्या घटना घडलेल्या असून येथील साहित्यांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे. मात्र, नव्याने येथे चोरीचा प्रयत्न होऊन काही वस्तूंची चोरी झाल्याने येथील साहित्यांची तोडफोड करणाऱ्या, तसेच चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक दक्षता कमिटीने केली आहे.

पोलीस स्टेशन व ग्रामपंचायतीला देण्यात आलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, स्मारक परिसरात बसविलेले सोलर यापूर्वी चोरीला गेलेले असून त्याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. मात्र, क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला येथील पथदिव्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडलेली असताना एक सप्टेंबर रोजी येथील स्मारक परिसरात लावण्यात आलेला एसीसाठी बसवण्यात आलेल्या कॉपर पाईपच्या पट्ट्यांची चोरी केली असल्याची तक्रार हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक दक्षता कमिटीने ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनला केली आहे.

तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीने स्मारकाची देखभाल करत रात्री आठनंतर स्मारक परिसरात संचारबंदीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येलाही विजेच्या खांबाची तोडफोड करून विजेचे दिवे पाडून अंधार केला होता. ग्रामपंचायतीला निवेदन दिले या वेळी मानव अधिकार फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष व हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक दक्षता कमिटीचे प्रमोद फुलसुंदर, स्मारक समितीचे अध्यक्ष महेश भुजबळ, शिवसेना संघटक चंद्रकांत भुजबळ, जगन्नाथ आल्हाट, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, श्रीकांत नरके, घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब ढमढेरे, संदीप ढमढेरे, सुनील ढमढेरे, विष्णू नरके, नवनाथ खरपुडे, मानवाधिकार फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष गोपाळ भुजबळ उपस्थित होते.

तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर येथील पद्मा विष्णू गणेश स्मारक दक्षता कमिटीच्या वतीने देण्यात आलेले निवेदन स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी.

040921\1537-img-20210903-wa0011.jpg

शुक्रवार पोलीस स्टेशनला निवेदन देताना स्मारक दक्षता कमिटीचे पदाधिकारी

Web Title: Attempt to steal items from the Martyrs Memorial area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.