पूररेषेतून मुक्ततेसाठी नदीपात्र खोलगट करण्याचे प्रयत्न
By admin | Published: May 12, 2015 04:20 AM2015-05-12T04:20:45+5:302015-05-12T04:20:45+5:30
नदीपात्रालगतचे क्षेत्र पूररेषेत येत असल्याने त्या ठिकाणी बांधकाम करण्यास परवानगी दिली जात नाही. अनेकांची नदीपात्रालगतची बांधकामे पूररेषेत
पिंपरी : नदीपात्रालगतचे क्षेत्र पूररेषेत येत असल्याने त्या ठिकाणी बांधकाम करण्यास परवानगी दिली जात नाही. अनेकांची नदीपात्रालगतची बांधकामे पूररेषेत बाधित झाली आहेत. त्यामुळे भविष्यात ही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी नदीपात्र खोलगट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरातील राजकारणी, नगरसेवक यांचीही पूररेषा हद्दपार व्हावी, अशी अपेक्षा आहे. परंतु शासन पातळीवर निर्णय कधी होणार याची प्रतीक्षा करण्यापेक्षा नदीपात्र खोलगट करण्याच्या उपाययोजनांना प्राधान्य दिले गेले असून, नदीपात्रात ठिकठिकाणी दिवसभर जेसीबी, पोकलेनने खडक फोडण्याचे काम सुरू असल्याचे दृश्य पहावयास मिळू लागले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये यापूर्वी राडारोडा टाकून नदीपात्र
उथळ करण्याचे उपद्व्याप अनेकांनी केले. काही बांधकाम व्यावसायिकांनी, तसेच नदीपात्रालगतच्या जमीनमालकांनी नदीपात्रात भराव टाकून त्या ठिकाणीही बांधकामे केली. त्यामुळे नदीपात्र उथळ होत गेले. पावसाळ्यात नदीपात्र भरून वाहिल्यानंतर अनेकदा आजुबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नदीपात्रालगतच्या नागरिकांचे नुकसान झाले. पूर्वी पूरनियंत्रण रेषाच अस्तित्वात नसल्याने नदीपात्रालगत किती अंतर सोडून बांधकाम करायचे याची काहीच नियमावली नव्हती. त्यामुळे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनीच पूरनियंत्रण रेषा निश्चित व्हावी, अशी मागणी केली.(प्रतिनिधी)