Pune Crime: रिक्षाचालकाला लुटून ठार मारण्याचा प्रयत्न; वानवडी पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या

By नम्रता फडणीस | Published: June 11, 2024 03:13 PM2024-06-11T15:13:10+5:302024-06-11T15:14:11+5:30

पुणे : रिक्षाचालकाचा मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून त्याच्यासह तिघांना मारहाण करून दहशत माजविल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी टोळीला अटक ...

Attempt to rob and kill a rickshaw puller; The Wanwadi police arrested the gang | Pune Crime: रिक्षाचालकाला लुटून ठार मारण्याचा प्रयत्न; वानवडी पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या

Pune Crime: रिक्षाचालकाला लुटून ठार मारण्याचा प्रयत्न; वानवडी पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या

पुणे : रिक्षाचालकाचा मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने काढून त्याच्यासह तिघांना मारहाण करून दहशत माजविल्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी टोळीला अटक केली आहे. सोमवारी (दि. १०) रात्री साडे बारा वाजता रामटेकडी येथील मगरीणबाई चाळ व ठोंबरे वस्ती भागात ही घटना घडली.

अजय विजय उकिर्डे (वय २३), लड्डू उर्फ साहिल रुस्तम वाघेला (वय २३) टिल्ली उर्फ इरफान गुलाम मोहम्मद शेख (वय २०) , हेमंत उर्फ बप्प्या नितीन दोडके (वय २२) , अभिजित अशोक काकडे (वय १९), राहुल वसंत ताटे (वय २१ रा. सर्व रामटेकडी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कपिल तांदळे (वय ३८ रा. रामटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रिक्षाचालक हे घरी येत असताना त्यांच्याच वस्तीमध्ये राहाणा-या आरोपींनी फिर्यादीची रिक्षा थांबवून त्यांच्या रिक्षाच्या हॅण्डलला लावलेला मोबाईल व शर्टाच्या खिशातून रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली.

फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करतो असे म्हणताच त्याचा राग मनात धरून फिर्यादीच्या रिक्षाच्या मागे पळत जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. फिर्यादी हे त्यांच्या घरी पोहोचले असता आरोपी फिर्यादीला मारहाण करू लागले. फिर्यादीचे नातेवाईक मध्ये पडल्याने फिर्यादीचा भाऊ व चुलत भाऊ यांना गंभीर जखमी करून ' आमच्या नादाला कुणी लागायचे नाही. कुणी मध्ये आले तर एकेकाला जीवे मारू अशी धमकी देत दहशत वाजविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आले आहे. पोलीस उपनिरिक्षक संजय आदलिंग पुढील तपास करीत आहे.

Web Title: Attempt to rob and kill a rickshaw puller; The Wanwadi police arrested the gang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.