Pune Crime | सुप्यात महालक्ष्मी ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न, गोळीबार करून चोरटे फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 11:26 AM2023-04-01T11:26:56+5:302023-04-01T11:29:12+5:30

महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात जाऊन दागिने पाहण्याचा बहाना करुन लुटण्याचा प्रकार...

Attempt to rob Mahalakshmi Jewelers in Supyat, thieves absconded after shooting | Pune Crime | सुप्यात महालक्ष्मी ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न, गोळीबार करून चोरटे फरार

Pune Crime | सुप्यात महालक्ष्मी ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न, गोळीबार करून चोरटे फरार

googlenewsNext

सुपे (पुणे) : सुपे बाजार मैदानानजिक असलेल्या महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानात जाऊन दागिने पाहण्याचा बहाना करुन लुटण्याचा प्रकार केला. यावेळी एकच गोंधळ झाल्याने दरोडेखोराने पळून जाण्याच्या प्रयत्नात गोळीबार केला. तर ग्रामस्थांना त्यातील एकाला पकडण्यात यश आले. तर तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी जखमी झालेल्यामध्ये सागर दत्तात्रय चांदगुडे ( वय ३० रा. तरटेवस्ती, पानसरेवाडी ), अशोक भागुजी बोरकर ( वय ५५ रा. बोरकरवाडी ), सुशांत क्षिरसागर ( सुपे ) अशी तिघांची नावे आहेत.

बाजार मैदानानजिक असलेल्या सुयश सुनिल जाधव यांच्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये दरोडेखोरांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी १५ तोळे सोने पळवण्याच्या प्रयत्नात दरोडेखोरांनी दुकानात गोळी झाडली. त्यानंतर बाहेर पळून जण्याचा प्रयत्नात असताना बाहेर उभे असलेल्या सागर चांदागुडे यांनी दरोडेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोराने गोळी झाडली असता त्यांना गोळी लागली. तर दुसऱ्या दोन गोळ्या अशोक बोरकर यांच्या पोटाला चाटुन गेली. तर सुशांत क्षिरसागर यांच्या पायाला गोळी लागली. 

त्यानंतर पोलिस नाईक दत्तात्रय धुमाळ, नाजीर रहीम शेख, राजकुमार लव्हे हे घटानस्थळी आले असता दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यातील एकाला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. तर तीन जण किया या चारचाकी गाडीतून फरार झाले. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाले असून एकावर साळूंखे हॉस्पिटमध्ये उपचार चालू आहेत.

दरम्यान सुपे पोलिस स्टेशनमध्ये पकडलेल्या दरोडेखोराचे पवन विश्वकर्मा ( रा. नागपुर ) असे नाव असून घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, विभागिय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी माहिती दिली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन काळे, पोलिस उपनिरिक्षक सल्लीम शेख करीत आहेत.

Web Title: Attempt to rob Mahalakshmi Jewelers in Supyat, thieves absconded after shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.