हातात बंदूक घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सर्वसामान्यांना हे भोगावं लागतंय"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 01:47 PM2024-11-01T13:47:27+5:302024-11-01T13:52:11+5:30

पुण्यात पुन्हा एकदा बंदूक दाखवून दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Attempt to spread terror among youths with guns Supriya Sule criticized the Mahayuti government | हातात बंदूक घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सर्वसामान्यांना हे भोगावं लागतंय"

हातात बंदूक घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "सर्वसामान्यांना हे भोगावं लागतंय"

Pune Crime : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. पुण्यात पुन्हा एकदा दहशत माजवण्याचा प्रकार समोर आला आहे. हातात बंदूक घेऊन बाईकवरुन जाताना भररस्त्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एकाने केला आहे. वडगाव ब्रिज ते वारजे ब्रिजपर्यंत हातात बंदूक घेऊन वाहनचालकांना घाबरवण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला आहे. दहशत पसरवण्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात हातात बंदूक घेऊन आणि गाडी चालकांना धमकावत तरुण गाडी चालवत होता. या सगळ्या घटनेवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.

पुण्यात हातात बंदूक घेऊन नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वडगाव ब्रिज ते वारजे ब्रिजपर्यंत बाईकवरुन जाणाऱ्या तरुणाने हातात बंदूक घेत इतर वाहनचालकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बाईकवरुन जाणारा तरुण हातात बंदूक घेऊन वाहनचालकांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पुणेपोलिसांकडून संबधित तरुणाचा शोध सुरु करण्यात आला आहे. यावरुन आता सुप्रिया सुळे यांनी  गृहमंत्री कमकुवत असल्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले असल्याची टीका केली आहे.

"पुण्यातील वारजे पूल ते नवले पूल दरम्यान भरदिवसा बंदूक नाचवत दहशत पसरविण्याचा प्रकार झाला झाला. ही घटना अतिशय गंभीर आहे. भाजपाप्रणीत महायुती सरकारच्या काळात गृहमंत्री कमकुवत असल्यामुळे गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले. त्याची कटू फळे सर्वसामान्य जनतेला भोगावी लागत आहेत. महाविकास आघाडी अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त करुन पुणे आणि राज्यभरात कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

गोळीबार झाल्याची पसरवली अफवा

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुण्यातील म्हात्रे पूल परिसरात एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांना फोनवरुन देण्यात आली होती. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. मात्र तपासानंतर एका अल्पवयीन मुलाने पोलिसांना फोन करुन खोटी माहिती दिल्याचे समोर आलं. त्यानंतर  पोलिसांनी मुलाच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अल्पवयीनाविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली.

Web Title: Attempt to spread terror among youths with guns Supriya Sule criticized the Mahayuti government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.