कोयत्याने वार करुन टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; गुलटेकडीमधील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 05:01 PM2021-07-29T17:01:41+5:302021-07-29T17:04:08+5:30

जीएसटी गँगच्या प्रमुखाला अटक : डायस प्लॉटमधील घटना 

Attempted half murder on youth by a criminal gang; Incidents in Gultekdi | कोयत्याने वार करुन टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; गुलटेकडीमधील घटना 

कोयत्याने वार करुन टोळक्याकडून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; गुलटेकडीमधील घटना 

googlenewsNext

पुणे : पैसे न देता खाद्यपदार्थ घेऊन जात असताना विरोध केलेल्या सोनु शेखचा शोध घेत असलेल्या टोळक्याने दुसर्‍या तरुणावर कोयत्याने वार करुन जबर जखमी केले. 

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. 
गोविंदसिंग पापुलसिंग टाक (वय २८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी उझेर हसीन खान (वय १९, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. खान यांचे गुलटेकडीत रब्बानी केटअर्स हे दुकान आहे. गोविंदसिंग टाक हा पैसे न देता त्यांच्या दुकानातील खादय पदार्थाचे घमेले घेऊन जात होता. त्याला सोनु शेख याने विरोध केला होता. या कारणावरुन २७ जुलै रोजी रात्री ९ वाजता टाक इतर पाच साथीदारांना घेऊन आला. त्याने हातात कोयते व पालघन हवेत फिरवून परिसरात दहशत पसरविली.
 

फिर्यादी व त्यांचा नातेवाईक साहिल शेख हा त्यांना पाहून पळून जाऊ लागले. तेव्हा टाक याने त्यांना अडवून सोन्या किधर है, असे विचारुन साहिल यांच्या डोक्यात कोयता मारण्याचा प्रयत्न केला असता साहिल मागे सरकला. त्यामुळे त्याचा वार हुकला. ते पाहून साहिल पळून जाऊ लागल्यावर टाक याने त्याच्या पाठीमागे कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच रुको, तुम नही बचोंगे असे मोठ मोठ्याने ओरडत फिर्यादी व साहील यांचे मागे धावत असताना फिर्यादी हे अंधारात टपरी खाली लपून बसले व साहिल हा आत गल्लीमध्ये पळत गेला.  परिसरातील लोक व हातगाडीवाले देखील त्यांना बघुन पळत होते. त्यानंतर गोविंदसिंग टाक हा डायस प्लॉट चौकात मोठया मोठ्याने ‘‘ये मेरा जीएसटी गँग है और उसका में भाई हुं, इस बस्ती में मेरा राज चलता है, और आगे चलता रहेगा, और मेरे खिलाफ जो पोलीस मे जायेगा उसको जिंदा नही छोंडुगा’’ असे ओरडत गोंविदसिंग व त्याचे साथीदार हातात कोयते व पालघन घेऊन नाचत होते. सहायक पोलीस निरीखक ए. के़. रसाळ तपास करीत आहेत.

Web Title: Attempted half murder on youth by a criminal gang; Incidents in Gultekdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.