Pune | हवेत गोळीबार करून वाईन शॉपच्या रोकड लुटीचा प्रयत्न; नऱ्हे येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 09:02 AM2023-04-24T09:02:25+5:302023-04-24T09:03:17+5:30

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Attempted looting of wine shop by shooting in the air; Incident at Narhe | Pune | हवेत गोळीबार करून वाईन शॉपच्या रोकड लुटीचा प्रयत्न; नऱ्हे येथील घटना

Pune | हवेत गोळीबार करून वाईन शॉपच्या रोकड लुटीचा प्रयत्न; नऱ्हे येथील घटना

googlenewsNext

धायरी (पुणे) : वाईन शॉप मालकाच्या हातून पैशांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रकार दोन अज्ञात लुटारुंनी केला. मात्र कामगार आणि नागरिक जमा झाल्याने लुटारूंनी हवेत गोळीबार करून पलायन केले आहे. ही घटना नऱ्हे येथील नवले हॉस्पिटलच्या पाठीमागील गेट जवळील हिरो वाईन्स परिसरात घडली आहे. याबाबत तुकाराम सोपान इंगळे (वय ५७, रा. शिवणे, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दोन अज्ञात लुटारूविरोधात तक्रार दिली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तुकाराम इंगळे यांच्या मालकीचे नऱ्हे परिसरात हिरो वाईन्स या नावाने वाईन्स शॉप आहे. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून आपल्या गाडीत बसत असताना धायरी फाट्याच्या दिशेने एका दुचाकीवर अनोळखी दोघेजण आले. त्यावर पुढे बसलेल्या काळया रंगाचा शर्ट घातलेल्या व मागील बाजुस बसलेल्या पांढरा शर्ट घातलेल्या तरुणांनी दुचाकीवरून खाली उतरुन तक्रारदार यांच्याजवळ येवून त्यांच्या हातातील पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेतील दोन लाख एकोणीस हजारांची रोकड हिसकावून जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

परंतु इंगळे यांनी ती बॅग घट्ट पकडल्याने त्यांना पैशांची बॅग मिळाली नाही. दरम्यान दुकानातील कामगार व नागरिक जमा झाल्याने तसेच बॅग न मिळाल्यामुळे या अनोळखी तरुणांनी त्यांच्या हातात असलेले पिस्तुल दहशत पसरवण्याचे उद्देशाने हवेच्या दिशेने रोखून त्यातील एक गोळी फायर केली. त्यानंतर ते महाराष्ट्र बँकेच्या दिशेने निघून गेले. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.

Web Title: Attempted looting of wine shop by shooting in the air; Incident at Narhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.