Pune Crime: दौंडमध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न, सहा जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 20:42 IST2023-08-29T20:42:02+5:302023-08-29T20:42:52+5:30
परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली....

Pune Crime: दौंडमध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न, सहा जणांवर गुन्हे
दौंड (पुणे) :दौंड येथे जिवे मारण्याचा प्रयत्न, प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अश्विन वाघमारे, राहुल नायडू, एक अज्ञात युवक, गौरव काळे, त्यागी रणदिवे, प्रकाश भालेराव (सर्व रा. दौंड) यांच्यावर परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अक्षय काळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवार (दि. २९) रोजी सकाळी मी आणि माझा मित्र त्यागी संविधान चौकात उभे होतो. यावेळी अश्विन वाघमारे, राहुल नायडू, एक अनोळखी युवक आमच्याजवळ आले. यावेळी ते म्हणाले की, मी वंचित बहुजन आघाडीचा तालुकाध्यक्ष असून तुम्ही नेहमी माझ्या नादाला लागत असतात, असे म्हणून मला शिवीगाळ आणि दमदाटी करून त्याच्या हातात असलेला पाइप घेऊन मला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली.
दौंड तालुका वंचित आघाडीचे अध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सकाळी संविधान चौकात गोरख काळे आणि त्याचा मित्र दोघे जण माझ्याजवळ आले आणि म्हणाले, तू सामाजिक कार्यकर्ता झाला का? तुझ्यामुळे आम्हाला त्रास होत आहे. तुला आम्ही सोडणार नाही, असे म्हणत गौरव काळे, प्रकाश भालेराव यांनी दमदाटी केली तर त्यागी रणदिवे याने कोयता काढून मारण्याचा प्रयत्न केला.