अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:11 AM2021-04-18T04:11:21+5:302021-04-18T04:11:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून इंटेलिजन्स ब्युरोमधील अधिकारी असलेल्याने दिल्लीपासून पुण्यापर्यंत आपल्या पत्नीचा माग काढला. ...

Attempted murder of wife on suspicion of immoral relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून इंटेलिजन्स ब्युरोमधील अधिकारी असलेल्याने दिल्लीपासून पुण्यापर्यंत आपल्या पत्नीचा माग काढला. तिला पुण्यातील एका हॉटेलमध्ये मित्रासह पकडले़ त्यानंतर झालेल्या भांडणात त्याने पत्नीला बेदम मारहाण करत गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

ही घटना नगर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये २७ जानेवारी २०२१ रोजी घडली होती. याप्रकरणी एका २९ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी सर्वप्रथम अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर आता पती व त्यांच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी पती हा इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अधिकारी होता. त्याने नुकताच राजीनामा दिला असून तो यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. तर फिर्यादी महिला बँकर आहे. ती हरयाणात रहात असून तिचा पती नवी दिल्लीत राहण्यास आहे.

फिर्यादी महिला तिच्या एका मित्रासोबत पुण्यात आली होती. ती नगर रस्त्यावरील एका आलिशान हॉटेलमध्ये मित्रासोबत उतरली. ती तिच्या मित्राच्या खोलीत सामान घेण्यासाठी गेली असतानाच पती इतर दोघांसोबत तेथे दाखल झाला. त्याने पत्नीच्या चारित्र्याचा संशयावरून बेदम मारहाण करून भिंतीवर डोके आपटले. यानंतर इतर दोघा आरोपींनी तिला ठार मारण्याची चिथावणी दिली. यानंतर आकाश तिच्या तोंडावर व पोटावर मारू लागल्याने मित्र जगप्रसाद मध्ये पडला. त्यालाही सर्वांनी बेदम मारहाण केली. फिर्यादी रुममधून जीव वाचवण्यासाठी पळत गेल्या असता, यातील एका आरोपीने तिला पाठीमागून पकडून विनयभंग केला. यानंतर आकाशने तिला गादीवर पाडून तिचा गळा दाबला. त्यानंतर महिलेने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देऊ लागली़ तेव्हा त्याने तिच्या हातातून मोबाईल काढून घेऊन तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला़ येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Attempted murder of wife on suspicion of immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.