हातोड्याने वार करुन खूनाचा प्रयत्न; नंबर प्लेटमध्ये खाडाखोड केल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 05:49 PM2022-05-02T17:49:01+5:302022-05-02T17:51:04+5:30

हातोड्याने वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात वेटरला अटक...

attempted murder with a hammer police also handcuffed the accused changed bike number plate | हातोड्याने वार करुन खूनाचा प्रयत्न; नंबर प्लेटमध्ये खाडाखोड केल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

हातोड्याने वार करुन खूनाचा प्रयत्न; नंबर प्लेटमध्ये खाडाखोड केल्यानंतरही पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

googlenewsNext

पुणे : सराईत गुन्हेगार असल्याने आपली ओळख पटू नये, म्हणून त्याने मोटारसायकलच्या नंबरप्लेटमध्ये खाडाखोड केली. ओळख पटू नये, म्हणून त्याने तोंडाला रुमाल बांधला, डोक्यावर टोपी घातली, तरीही चिकाटीने तपास करुन पोलीस ७२ तासाच्या आत या सराईत गुन्हेगारापर्यंत पोहचले. शिवाजीनगर पोलिसांनी बालाजी शंकर बनसोडे (वय ३६, सध्या रा. हॉटेल राजलक्ष्मी, कर्वेनगर, मुळ रा. सोलापूर) याला अटक केली. बनसोडे याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, मारहाणीचे गुन्हे सोलापूर पोलीस आयुक्तालयात दाखल आहेत.

हेमंत कणसे (वय ३५) यांचे शिवाजीनगर येथील शिवाजी पुलाखाली स्वामी समर्थ ज्युस सेंटर आहे. गेल्या बुधवारी सकाळी कणसे ज्युस सेंटरवर असताना एक जण आला. त्याने लोखंडी हातोड्याने कणसे यांच्या डोक्यात, कानाजवळ, डोक्याच्या पाठीमागे एका मागोमाग एक असे तीन वार केले. त्यांना वाचविण्यासाठी कामगार दीपक सोळंके धावले असताना हल्लेखोराने त्यांच्याही डाव्या हाताच्या दंडावर हातोड्याने मारुन जखमी केले. त्यानंतर हल्लेखोर मोटारसायकलवरुन पळून गेला.

या गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त मोटारसायकलचा नंबर हाच काय तो पुरावा पोलिसांच्या हाती लागला होता. त्याआधारे तपास करत असताना त्यांना तिच्या नंबरप्लेटमध्ये खाडाखोड केल्याचे आढळून आले. सहायक निरीक्षक अहिवळे व त्यांच्या सहकार्यांना तांत्रिक विश्लेषणात नंबरप्लेटमधील ४ हा आकडा दोनदा होता, परंतु त्यावर चिकटटेप लावून तो १ केला असल्याचे आढळून आले. मुळ नंबर मिळाल्याने त्यावरुन पोलिसांनी शोध सुरु केला. आरोपी हा कर्वेनगर येथील एका हॉटेलमध्ये काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी बनसोडे याला पकडले.

बनसोडे हा काम शोधण्यासाठी पुण्यात आला होता. शिवाजीनगर येथील एका दुकानाबाहेर तो दिवसभर बसत असे. त्यातून त्याला हेमंत कणसे हे काही वेळा बोलले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाला होता. या कारणावरुन बनसोडे याने कणसे यांच्यावर हल्ला करुन खूनाचा प्रयत्न केला होता.

५ जणांना विकली होती मोटारसायकल-
या गुन्ह्यात मोटारसायकलचा नंबर व तोही खाडाखोड केलेला इतकाच पुरावा होता. त्यावरुन पोलिसांनी मोटारसायकलचा मुळ नंबर शोधून काढला. तिचा मालक शोधत असताना ते मालकापर्यंत पोहचल्यावर त्यांनी आपण ही मोटारसायकल दुसऱ्याला विकल्याचे सांगितले. दुसऱ्याला गाठल्याने त्याने तिसऱ्याला विकल्याचे सांगितले. अशाप्रकारे चार जणांकडून विकली गेलेली मोटारसायकल बनसोडेने वापरली होती. तरीही पोलिसांनी सर्वांचा शोध घेऊन शेवटी बनसोडेपर्यंत पाेहचलेच.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, अंमलदार अतुल साठे, प्रविण राजपूत, रणजित फडतरे, अविनाश भिवरे, भालचंद्र बोरकर, कांतीलाल गुंड, शरद राऊत व पालके यांनी केली.

Web Title: attempted murder with a hammer police also handcuffed the accused changed bike number plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.