महिलेेकडून डास मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:48+5:302021-05-24T04:09:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तुझा संसार उद्ध्वस्त करून फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देऊन पती व सासूच्या मोबाईलवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तुझा संसार उद्ध्वस्त करून फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देऊन पती व सासूच्या मोबाईलवर फोन करून त्रास देणाऱ्याच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने डास मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वैभव दत्तात्रय धस, दत्तात्रय धस आणि नितीन धस (सर्व रा. शिक्षक कॉलनी, ता. केज, जि. बीड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाघोलीमधील एका २५ वर्षांच्या विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी व वैभव धस हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वैभव याने फिर्यादीला वारंवार फोन करुन अश्लील भाषेत बोलून संबंध ठेव, कॉल उचल, असे बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्याची या विवाहितेने तक्रार दिली होती. त्यावर फिर्यादीने तक्रार मागे घ्यावी म्हणून तिच्या भावाला जिवे मारण्यासाठी गुंड पाठविले होते. तसेच फिर्यादी यांना तुझा संसार उद्ध्वस्त करून टाकीन, तुझे फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली. तसेच तिचे पती व सासू यांना मोबाईलवर फोन करून त्यांनाही त्रास दिला. हा प्रकार ११ मार्च पासून २१ मेपर्यंत सुरु होता. या सततच्या छळाला कंटाळून फिर्यादीने घरातील डास मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून महिला पोलीस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.