भाजपा पदाधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न, कारण गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:10 AM2018-07-09T01:10:38+5:302018-07-09T01:10:47+5:30
भोरमध्ये येत असताना तीन ते चार जणांनी कार आडवी लावून गाडीच्या काचा फोडून चाकूने वार करुन कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रितेश वैद्य (वय ४०) यांच्या खुनाचा प्रयत्न केला.
पुणे /भोर - भोरमध्ये येत असताना तीन ते चार जणांनी कार आडवी लावून गाडीच्या काचा फोडून चाकूने वार करुन कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रितेश वैद्य (वय ४०) यांच्या खुनाचा प्रयत्न केला़ ही घटना भोर -महाड रोडवरील निगुडघर दरम्यान शनिवारी रात्री साडेआठ वाजता घडली़ या घटनेत रितेश वैद्य गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खेड शिवापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात येत आहे़ याप्रकरणी तेजस प्रदीप कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे़
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रितेश आनंद वैद्य, रमेश परमार, उदय कड हे तेजस कुलकर्णी यांच्या गाडीतून शनिवारी फलटण येथील मित्राच्या भावाच्या लग्नाला गेले होते़ तेथून ते सासवडला आले. त्या ठिकाणी उदय कड यांच्या शेटटी नावाच्या मित्रास भेटले. ़ शेटटी व त्यांचे मित्र असे चार जण एका गाडीत व तेजस कुलकर्णी यांच्या गाडीत चार एका गाडीने नारायणपुरवरुन भोरला आणि इथुन निगुडघरला सायंकाळी ७ वाजता पोहचले. जेवण झाल्यावर शेटटी तिथेच थांबले तर एक गाडी भोर बाजुकडे निघाली महाड-भोररोडवरुन निगुडघरच्या पुढे आल्यावर वाटेत ते लघुशंकेसाठी थांबले़ त्यावेळी रितेश वैद्य गाडी चालवत होते़ सर्व जण पुन्हा गाडीत बसल्यावर मागुन आलेल्या दुसºया गाडीने त्यांच्या गाडीला आडवी लावुन थांबायला भाग पाडले़ त्या गाडीतून ३ ते ४ जणांनी खाली उतरून दांडक्याने गाडीच्या काचा फोडल्या़ रितेश वैद्य याच्या छातीवर पोटात धारधार शस्त्राने वार केले़ वैद्य यांना खेड शिवापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असुन त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेची महिती रविवारी सकाळी मिळाल्यावर पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी घटना स्थळाला भेट देऊन महिती घेतली़ यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक डॉ़ संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, पोलीस निरीक्षक घोडसे हे उपस्थित होते़ आमदार मेधा कुलकर्णी यांनी भोर पोलीस ठाण्याला भेट दिली.
रतेश वैद्य कोथरुड विधानसभा मतदार संघाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष असून तेजस कुलकर्णी पुणे शहर भाजपा युवा मोर्चाचे संपर्क प्रमुख तर उदय कड पुणे जिल्हा हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष आहेत. सर्व जण मित्र असुन एकत्र लग्नाला गेले़ तिथुन ते जेवायला भोरला आले होते़