नव्या पोलीस ठाण्यांना मनुष्यबळ, साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयत्न ; पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 09:33 PM2021-03-25T21:33:40+5:302021-03-25T21:33:56+5:30

लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाणे दोन दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्तालयात समाविष्ट झाले आहेत.

Attempts to provide manpower and equipment to new police stations; Important decisions in the meeting of police officers | नव्या पोलीस ठाण्यांना मनुष्यबळ, साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयत्न ; पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

नव्या पोलीस ठाण्यांना मनुष्यबळ, साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयत्न ; पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

Next

पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयात नव्या समाविष्ट झालेल्या लोणीकाळभोर, लोणीकंद पोलीस ठाण्याला अधिक मनुष्यबळ, साधनसामुग्री पुरविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस व शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकार्‍यांची आज एकत्रित बैठक झाली असून त्यात त्यादृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकारी या पोलीस ठाण्यांना दररोज भेट देणार आहेत. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, उपायुक्त स्वप्ना गोरे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, दोन्ही पोलीस ठाण्यांचे निरीक्षक व इतर अधिकार्‍यांची आज पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. 

लोणी काळभोर, लोणीकंद पोलीस ठाणे दोन दिवसांपासून पुणे पोलीस आयुक्तालयात समाविष्ट झाले आहेत. या दोन्ही पोलीस ठाण्यात सध्या ४९ आणि ३८ इतकी पोलिसांची संख्या आहे. शहर पोलीस दलातील ७ अधिकारी आणि काही पोलीस कर्मचारी या दोन्ही पोलीस ठाण्यासाठी सध्या देण्यात आले आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत वाहतूकीची समस्या जटील आहे. त्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग निर्माण करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेकडून त्या परिसरात वाहतूक पोलीस देण्यात येणार आहे. येथील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त हे दररोज या पोलीस ठाण्यांना भेट देणार आहेत, अशी माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

शहराप्रमाणेच नव्याने समाविष्ट झालेल्या परिसरात पोलिसांची उपस्थित वाढविण्यासाठी कर्मचारी पुरविणे, त्यांना वाहने पुरविणे याचे नियोजन करण्यात येत असून सध्या काही कर्मचारी देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात शहराप्रमाणेच त्या परिसरात टप्प्या टप्प्याने पोलिसांचे पेट्रोलिंग सुरु होणार आहे. 

शहर पोलीस आयुक्तालयाचे सध्या जेवढे कार्यक्षेत आहे. त्याच्यापेक्षा अधिक या दोन पोलीस ठाण्याचे क्षेत्रफळ आहे. इतक्या मोठ्या भुभागावर शहराप्रमाणे पोलिसिंग राबविण्यास वेळ लागणार आहे.

Web Title: Attempts to provide manpower and equipment to new police stations; Important decisions in the meeting of police officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.