पुणे पालिकेच्या शाळा मात्र १५ जूनपासून सुरू करण्याचा प्रयत्न; पालकांना दिल्या गेल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 09:49 PM2020-06-02T21:49:17+5:302020-06-02T21:52:04+5:30

पालिकेच्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात.. एकूण ९२ हजार ७४० विद्यार्थी

Attempts to start Pune Municipal School from June 15; about instructions give to parents | पुणे पालिकेच्या शाळा मात्र १५ जूनपासून सुरू करण्याचा प्रयत्न; पालकांना दिल्या गेल्या सूचना

पुणे पालिकेच्या शाळा मात्र १५ जूनपासून सुरू करण्याचा प्रयत्न; पालकांना दिल्या गेल्या सूचना

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर ते साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार गावी गेलेली आणि लवकर परतू न शकणारी मुले किती आहेत, याची पटपडताळणी होणार

पुणे : राज्यातील शाळा सुरू करण्यावरून तर्कवितर्क सुरू असतानाच आता पालिकेच्या शाळाही १५ जूनपासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रमुख मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. फक्त ही शाळा भरणार आहे ऑनलाईन. एरवी शाळेच्या ज्या वेळा होत्या त्याच वेळेत शाळा भरणार असून त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.
 पालिकेच्या शाळेत पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी शिकतात. पहिली ती आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत दिली जाणारी पुस्तके महापालिकेच्या पाच केंद्रांवर पोहोचली आहेत. ही पुस्तके पुढील पाच दिवसात प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यन्त पोचविण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यापुढील पाच दिवसात ही पुस्तके पालकांना बोलावून त्यांच्याकडे दिली जाणार आहेत. पालकांना वेळा ठरवून दिल्या जाणार असून त्याच वेळांमध्ये येऊन त्यांना पुस्तके घ्यावी लागतील. 
पालकांचे मोबाईल क्रमांक घेऊन तयार केलेल्या व्हॉट्सअप ग्रुप्सचा वापर यासंदर्भातील सूचना देण्याकरिता केला जाणार आहे. शिक्षण विभागाशी संबंधित सर्व विभागांनी 'एज्युमित्रा अ‍ॅप' डाऊनलोड केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी ७० हजार १३९ आयडी उघडण्यात आले असून ते पालकांपर्यंत पोचविण्यात आले आहेत. पालकांना या अँपच्या सहाय्याने पुस्तके डाऊनलोड करता येणार आहेत. पालकांना याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.
 ------------- 
महापालिका शाळांमध्ये असंघटित कामगार आणि आर्थिक दुर्बल घटकांतील मुले शिकतात. लॉकडाऊनच्या काळात अनेक मजूर, कामगार वगैरे आपापल्या गावी गेले आहेत. गावी गेलेली आणि लवकर परतू न शकणारी मुले किती आहेत, याची पटपडताळणी होणार असून शाळा सुरू झाल्यावर पटसंख्या स्पष्ट होईल. 
--------------- 
१. महापालिकेच्या शाळांमध्ये एकूण ९२ हजार ७४० विद्यार्थी आहेत. अन्य मुलांनाही समाविष्ट करून घेतले जाणार असून शिक्षक करणार पाठपुरावा
२. पुस्तकांशिवाय दप्तर, शूज, मोजे, गणवेश आणि अन्य स्टेशनरी शाळेतर्फे दिली जाते. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर ते साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.  

Web Title: Attempts to start Pune Municipal School from June 15; about instructions give to parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.