संविधान सन्मान सभेत अांबेडकर काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 06:53 PM2018-11-25T18:53:10+5:302018-11-25T18:54:55+5:30
संविधान दिनाचे अाैचित्य साधत वंचित बहुजन अाघाडीच्या वतीने पुण्यात संविधान सन्मान सभा अायाेजित करण्यात अाली अाहे.
पुणे : साेलापूर अाणि अाैरंगाबाद येथील वंचित बहुजन अाघाडीच्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे अाता पुण्यातील संविधान सन्मान सभेत अॅड प्रकाश अांबेडकर काय बाेलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले अाहे. साेमवारी 26 नाेव्हेंबर राेजी पुण्यातील एसएसपीएमएस च्या मैदानावर संध्याकाळी 4 वाजता ही सभा हाेणार अाहे. या सभेत प्रकाश अांबेडकर तसेच एमअायएमचे अामदार इम्तिजायज जलिल अाणि वंचित बहुजन अाघाडीचे इतर नेते उपस्थितांना संबाेधित करणार अाहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयाेध्या दाैरा करुन राम मंदिराची मागणी पुन्हा एकदा केली असताना प्रकाश अांबेडकर या सगळ्यावर काय बाेलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे.
26 नाेव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जाताे. या दिनाचे अाैचित्य साधून वंचित बहुजन अाघाडी तर्फे पुण्यात संविधान सन्मान सभेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. या सभेत अॅड प्रकाश अांबेडकर सध्या गाजत असलेल्या विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता अाहे. तसेच एमअायएमचे अामदार इम्तियाज जलिल हे सुद्धा या सभेच्या माध्यमातून उपस्थितांना संबाेधित करणार अाहेत. साेलापूर पाठाेपाठ अाैरंगाबाद येथील वंचित बहुजन अाघाडीच्या सभांना माेठा प्रतिसाद लाभल्याने इतर पक्षांचे खासकरुन काॅंग्रेसचे पुण्यातील सभेकडे लक्ष लागले अाहे. दलित अाणि मुस्लिम ही काॅंग्रेसची पारंपारिक मते येत्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन अाघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे. या सभेला धनगर समाजाचे नेते अॅड विजयराव माेरे, भारिप बहुजन महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशाेक साेनाेने, भटके विमुक्त नेते लक्ष्मण माने, अंजली अांबेडकर अादी उपस्थित राहणार अाहेत. त्याचबराेबर शितल साठे यांचा शाहिरी जलसा देखिल या कार्यक्रमाचे अाकर्षण असणार अाहे.