आयुक्तांच्या आदेशाकडे लक्ष

By admin | Published: February 4, 2016 01:18 AM2016-02-04T01:18:40+5:302016-02-04T01:18:40+5:30

सहकार क्षेत्रात भूकंप आणणारा रुपी सहकारी बँकेचा चौकशी अहवाल जाहीर झाल्यानंतर आता सहकार आयुक्त १९० कोटींच्या वसुलीचे आदेश देणार की नाही

Attention to Commissioner's orders | आयुक्तांच्या आदेशाकडे लक्ष

आयुक्तांच्या आदेशाकडे लक्ष

Next

पुणे : सहकार क्षेत्रात भूकंप आणणारा रुपी सहकारी बँकेचा चौकशी अहवाल जाहीर झाल्यानंतर आता सहकार आयुक्त १९० कोटींच्या वसुलीचे आदेश देणार की नाही, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
तब्बल १४ वर्षे चौकशी झाल्यानंतर चौकशी अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी हा अहवाल मंगळवारी जाहीर केला. यामध्ये १५ संचालक आणि ५४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यांच्याकडून १,४९० कोटी रुपयांची वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत.
हा अहवाल सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांना अजून सोपविण्यात आलेला नाही. तो येत्या एक-दोन दिवसांत सोपविण्यात येईल. त्यामुळे वसुलीचे काम त्यांच्यामार्फत केले जाणार आहे. यासाठी आयुक्तांना वसुली दाखला काढावा लागणार आहे. त्यामुळे आता आयुक्त काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Attention to Commissioner's orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.