यवतमाळ संमेलनाकडे रसिकांचे लक्ष : संमेलनाध्यक्षपदाची कसर मुलाखतीतून भरून निघणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:02 AM2018-12-24T03:02:59+5:302018-12-24T03:03:35+5:30

प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत हे यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

 Attention to the Yavatmal gathering: How can the candidature of the President be filled up by interview? | यवतमाळ संमेलनाकडे रसिकांचे लक्ष : संमेलनाध्यक्षपदाची कसर मुलाखतीतून भरून निघणार?

यवतमाळ संमेलनाकडे रसिकांचे लक्ष : संमेलनाध्यक्षपदाची कसर मुलाखतीतून भरून निघणार?

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत हे यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत नाव असलेल्या गणोरकर यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याचा बहुमान देत साहित्य महामंडळाच्या पदाधिकाºयांनी सुवर्णमध्य
साधला आहे. प्रभा गणोरकर
यांनी एकीकडे महामंडळाच्या निर्णयावर नाराजीचा सूर लावत दुसरीकडे मुलाखतीचे आमंत्रणही स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ११ ते १३ जानेवारी दरम्यान यवतमाळला होत आहे. अनेक वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदासाठी होत असलेली निवडणूक रद्द करून, सन्मानाने निवडीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. साहित्य महामंडळाच्या बैठकीत घटक संस्थांनी पाठवलेल्या नावांमधून बहुमताने डॉ. अरुणा ढेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून डॉ. अरुणा ढेरे तर विदर्भ साहित्य संघाने प्रभा गणोरकर यांचे नाव सुचवले होते. विदर्भ साहित्य संघाकडे महामंडळाचे हे शेवटचे वर्ष असल्याने विदर्भाकडे संमेलनाध्यक्षपद राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, साहित्य महामंडळाच्या बैठकीत झालेल्या मतदानानंतर अरुणा ढेरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता संमेलनात प्रभा गणोरकर यांची विशेष मुलाखत आयोजित करून महामंडळाने कसर भरून काढल्याची चर्चा साहित्यक्षेत्रात आहे.
यवतमाळ येथील संमेलनात मुलाखत आयोजित केली असल्याच्या वृत्ताला प्रभा गणोरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला. ‘आपल्या हातून एक महत्त्वाचा बदल झाला पाहिजे, अशा निश्चयातून ही संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे.
संमेलनाध्यक्षांच्या नावासाठी पुरुष साहित्यिकांचा विचारही झाला होता. मात्र, सन्मानाने निवड आणि महिला संमेलनाध्यक्ष अशी दोन प्रकारची क्रांती आपण करत आहोत, हे त्यांनी अधोरेखित केले, अशी प्रतिक्रिया त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. संबंधितांना कार्यक्रमाबाबत पत्रे पाठवण्यात आली आहेत. अंतिम स्वरूपावर पुढील दोन-तीन दिवसांत शिक्कामोर्तब होईल. त्यानंतर कार्यक्रमपत्रिका जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे, सध्या कार्यक्रम अथवा मुलाखतीबाबत काहीही भाष्य करता येणार नाही.
- डॉ. श्रीपाद जोशी,
अध्यक्ष, साहित्य महामंडळ

राजकारण कधीही बंद होत नसते...
महामंडळाने मुलाखतीबाबत कळवले आहे. एवढी वर्षे निवडणुकीने अध्यक्ष ठरत होता, तो आता निवडीने ठरणार आहे. त्यामुळे काहीच फरक पडलेला नाही. राजकारण कधीही बंद होत नसते. निवडणूक असो की निवड, राजकारण कायम असते. त्याचा केवळ चेहरा बदलतो, वरवरचे दृश्य बदलते. निवडीची चांगली गोष्ट आपल्याकडून घडावी, याबद्दल महामंडळाच्या मंडळींनी मनाशी आग्रह बाळगलेला दिसतो. आपल्या हातून एक महत्त्वाचा बदल झाला पाहिजे, अशा निश्चयातून ही संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात आली आहे. संमेलनाध्यक्षांच्या नावासाठी पुरुष साहित्यिकांचा विचारही झाला होता. मात्र, सन्मानाने निवड आणि महिला संमेलनाध्यक्ष अशी दोन प्रकारची क्रांती आपण करत आहोत, हे त्यांनी अधोरेखित केले.
- डॉ. प्रभा गणोरकर, कवयित्री

Web Title:  Attention to the Yavatmal gathering: How can the candidature of the President be filled up by interview?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी