ज्योतिर्लिंग मंदिरात आकर्षक फुलाफळांची सजावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:15+5:302021-09-07T04:13:15+5:30
नोकरी व्यवसायानिमित्ताने परगावी असलेल्या युवकांनी ऑनलाइन पेमेंट करुन या सजावटीसाठी आर्थिक सहकार्य केले, तर गावातील काही युवकांनी आपल्या बागेतील ...
नोकरी व्यवसायानिमित्ताने परगावी असलेल्या युवकांनी ऑनलाइन पेमेंट करुन या सजावटीसाठी आर्थिक सहकार्य केले, तर गावातील काही युवकांनी आपल्या बागेतील फळे मंदिरात आणून दिली. सोमवारी पहाटे एक वाजल्यापासून शिवभक्त देवराम पाटोळे, त्यांचे कुटुंबातील सदस्य व सहकारी मित्रांनी रात्रभर जागून ही आकर्षक सजावट केली. या सजावटीसाठी नारळ, चिक्कू, पेरू, डाळिंब, बेल ही स्थानिक शेतकऱ्यांची फळे तर केळी, सफरचंद, मोसंबी, अननस, खरबूज, कलिंगड या फळांची आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आल्याने गाभाऱ्यातील व मंदिरातील वातावरण प्रसन्न होते.
दर वर्षी श्रावण महिन्यात मानाच्या पाटलांच्या हस्ते पहाटे अभिषेक झाल्यानंतर शेकडो युवक दुपारपर्यंत अभिषेक करतात. हे सगळे अभिषेक महिनाभर टाळले गेले. श्रावणातील पाचवा तसेच शेवटच्या सोमवारी पहाटेचा अभिषक पुरोहित अजित मांडके व पुजारी प्रभाकर शिंदे (गुरव) यांनी केला. तर गाभाऱ्यातील फुलांची सजावट देवराम पाटोळे यांनी केली होती.
चौकट
कोरोनामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंदी असली तरी या आकर्षक सजावटीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले, त्यामुळे भाविकांनी घरबसल्या शिवलिंगाचे दर्शन झाले. ऑनलाईन दर्शन झाल्याने शिवभक्तांनी समाधान व्यक्त केले.