कपर्दिकेश्वर मंदिरात आकर्षक तांदळाच्या पिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:15 AM2021-09-07T04:15:13+5:302021-09-07T04:15:13+5:30

पाचवा श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमवती अमावास्या या पर्वणीवर परंपरेनुसार शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या उभ्या ...

Attractive rice pindi in Kapardikeshwar temple | कपर्दिकेश्वर मंदिरात आकर्षक तांदळाच्या पिंडी

कपर्दिकेश्वर मंदिरात आकर्षक तांदळाच्या पिंडी

googlenewsNext

पाचवा श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमवती अमावास्या या पर्वणीवर परंपरेनुसार शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या उभ्या पाच कलात्मक पिंडी साकारण्यात आल्या. पहाटे ४ वाजता शिवलिंगास महाअभिषेक व पारंपरिक पिंडीची महापूजा व महाआरती देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, सीमा तांबे व सरपंच नीता नितीन पानसरे या दांपत्याने केली. या वेळी मंदिर पुजारी गोविंद डुंबरे, अनिल तांबे, दत्ता शिंदे महाराज, महेंद्र गांधी, पानसरे सचिव, वसंतराव पानसरे, केरभाऊ शिंगोटे, ज्ञानेश्वर पानसरे, धर्मनाथ पानसरे, रघुनाथ तांबे, सीताराम तांबे, पांडुरंग ताजणे उपस्थित होते. सकाळी ६ वाजता मंदिर बंद करण्यात आले. ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

फोटो :

Web Title: Attractive rice pindi in Kapardikeshwar temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.