औंध-येरवडा-शिवाजीनगरात कोरोना रुग्णवाढीची टक्केवारी आली शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:48+5:302021-02-06T04:19:48+5:30

लक्ष्मण मोरे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोना रुग्णवाढीची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर खाली आली असून सरासरी एक टक्का ...

In Aundh-Yerawada-Shivajinagar, the percentage of corona outbreaks was zero | औंध-येरवडा-शिवाजीनगरात कोरोना रुग्णवाढीची टक्केवारी आली शून्यावर

औंध-येरवडा-शिवाजीनगरात कोरोना रुग्णवाढीची टक्केवारी आली शून्यावर

Next

लक्ष्मण मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील कोरोना रुग्णवाढीची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर खाली आली असून सरासरी एक टक्का वाढ मागील दोन आठवड्यांत नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबरपर्यंत कोरोनामुळे हैराण झालेल्या नागरिकांना गेल्या दीड-दोन महिन्यात दिलासा मिळाला आहे. औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रस्ता आणि येरवडा-कळस-धानोरी या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत तर या आठवड्यात शून्य टक्के वाढ नोंदविण्यात आली. कोरोनाची घटत चाललेली आकडेवारी पाहता पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.

शहरात राज्यातील पहिला रुग्ण सन २०२० च्या ९ मार्चला आढळून आला. त्यानंतर झपाट्याने रुग्ण वाढत गेले. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक १७ हजार ९०० ची रुग्णवाढ नोंदवण्यात आली. गणेशोत्सवानंतर ही वाढ झाली होती. दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु, सुदैवाने अद्याप ही लाट आलेली नाही.

पालिकेकडून दर आठवड्याला कोरोनाचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ३ फेब्रुवारीच्या अहवालात गेल्या दोन आठवड्यांतील ‘ट्रेंड’ देण्यात आले. यात २१ ते २७ जानेवारी आणि २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या काळातील वाढ सरासरी एक टक्का नोंदली गेली. यातील तीन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत शून्य टक्के वाढीचा ‘ट्रेंड’ आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले की, क्षेत्रीय कार्यालयनिहाय तसेच शहर पातळीवरही कोरोना रुग्णांची टक्केवारी कमी होते आहे. या काळातही पालिकेने तपासण्यांची संख्या कमी केलेली नाही. लोकांना वेळेत उपचार मिळत आहेत. पालिकेच्या प्रत्येक विभागाने केलेल्या कामामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे रुग्ण कमी होत आहेत ही सकारात्मक बाब आहे.

- रुबल अगरवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका चौकट

२८ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यानची आकडेवारी

क्षेत्रीय कार्यालय एकूण कोरोना रुग्ण ‘वाढीचा ट्रेंड’ (टक्केवारी)

औंध बाणेर ७५ ०

भवानी पेठ ३७ १

बिबवेवाडी ६२ १

धनकवडी-सहकारनगर ७१ १

ढोले पाटील ३४ १

हडपसर १२१ १

कसबा पेठ ६१ १

कोंढवा-येवलेवाडी ६४ १

कोथरुड-बावधन ८६ १

नगर रस्ता १२४ १

शिवानीगर-घोले रस्ता ४८ ०

सिंहगड १०५ १

वानवडी ३१ १

वारजे-कर्वेनगर ८३ १

येरवडा-कळस-धानोरी ६९ ०

महापालिका हद्दीबाहेर ०

एकूण १०६ ११

Web Title: In Aundh-Yerawada-Shivajinagar, the percentage of corona outbreaks was zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.