रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
By admin | Published: August 31, 2015 04:08 AM2015-08-31T04:08:44+5:302015-08-31T04:08:44+5:30
रिक्षामध्ये प्रवाशाचा विसरलेला ६० हजारांचा ऐवज रिक्षाचालक सचिन कोलते यांनी परत के ला आहे. रिक्षाचालक सचिन महादेव कोलते
मुंढवा : रिक्षामध्ये प्रवाशाचा विसरलेला ६० हजारांचा ऐवज रिक्षाचालक सचिन कोलते यांनी परत के ला आहे.
रिक्षाचालक सचिन महादेव कोलते (वय ३१, केशवनगर) यांच्या रिक्षात मगरपट्टा येथील दिव्यजित सिंग हे प्रवास करीत होते. रिक्षात ६० हजार रुपये किमतीचा एक मोबाईल व फ्लॅटची चावी दिव्यजित विसरले. आता आपला मोबाईल व चावी मिळणार की नाही, असे दिव्यजित यांना वाटले होते. मात्र रिक्षाचालक कोलते यांनी रिक्षात विसरलेला मोबाईल व चावी मुंढवा पोलीस ठाण्यात देऊन आपल्या प्रामाणिकपणाचा पुरावा दिला. त्या मोबाईलवर आलेल्या क्रमांकावर मोबाईलच्या मूळ मालकाचा तपास घेऊन कागपत्रांची शहानिशा करून रिक्षाचालक कोलते यांनी पोलिसांच्या समक्ष तो मोबाईल व चावी दिव्यजित यांना परत केली.
कोलते हे पदवीधर आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते दिवसा दिघी येथील एका खासगी कंपनीत काम तर रात्रीच्या वेळी रिक्षा चालवून कुटुंबाचे पालनपोषण करतात. दरम्यान, रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे पोलिसांनी कौतुक केले आहे. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळंबीकर, पोलीस हवालदार एन. बी. गायकवाड उपस्थित होते. (वार्ताहर)