सत्ताधाऱ्यांनी ऑनलाईन मुख्यसभाही केली तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:09 AM2021-06-29T04:09:17+5:302021-06-29T04:09:17+5:30

पुणे : शहरात आंबिल ओढ्यातील अतिक्रमण कारवाईचा विषय चर्चिला जात असतानाच या विषयासह, कचरा वेचकांचा प्रश्न घेऊन महापालिकेबाहेर आंदोलन ...

Authorities also held an online rally | सत्ताधाऱ्यांनी ऑनलाईन मुख्यसभाही केली तहकूब

सत्ताधाऱ्यांनी ऑनलाईन मुख्यसभाही केली तहकूब

Next

पुणे : शहरात आंबिल ओढ्यातील अतिक्रमण कारवाईचा विषय चर्चिला जात असतानाच या विषयासह, कचरा वेचकांचा प्रश्न घेऊन महापालिकेबाहेर आंदोलन करणाऱ्या स्वच्छ संघटनेचा विषय चर्चिला जाऊ नये. याकरिता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी महापालिकेची ऐनवेळी ऑनलाईन सभाही तहकुब केली, असा आरोप विरोधी सदस्यांनी केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मुख्यसभा तसेच वेगवेगळया समित्यांच्या सभा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचे आदेश सोमवारी राज्य शासनाने काढले आहेत. हे आदेश दुपारी प्राप्त झाल्याने ऐनवेळी ऑनलाईन सभेची पूर्ण तयारी करता आली नसल्याचे सांगून, सत्ताधारी भाजपने आजची सभा तहकूब केली असल्याचे सांगितले आहे.

आजची सभा ही मेट्रो आणि पीएमपीच्या विषयावर होणार होती. मात्र आंबिल ओढा कारवाई व कचरा वेचकांचे आंदोलन यामुळे ही सभा वादळी ठरली असती.

दरम्यान सभेच्या एक तास आधीच राज्यशासनाने मुख्यसभा घेऊ नयेत असे आदेश दिल्याची माहिती नगरसचिव विभागाकडून सभागृह नेते गणेश बिडकर यांना देण्यात आल्या. त्यानंतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सभेसाठी पालिकेत येऊ नये क्षेत्रिय कार्यालयातच ऑनलाईन सभा होईल असा निरोप देण्यात आला. त्यामुळे, अनेक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. आम्हाला बोलू दिले जात नाही तर ऑनलाईन सभेला तरी कशाला बोलविले असा प्रतिप्रश्न उपस्थित करीत काहींनी संतापही व्यक्त केला.

--------------------------

आज सकाळी अचानक अकरा वाजता सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी, असे आदेश राज्य सरकारचे आले. याची माहिती सर्व सभासदांना देऊन ऑनलाईन पद्धतीने जीबी चे नियोजन करणे प्रशासनाला शक्य नव्हते. त्यामुळे जीबी तहकूब करून पुढे ढकलण्यात आली.

- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका

-------------------

सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार

आंबिल ओढ्याचा विषयावर चर्चा होईल म्हणून ऑनलाईन सभेची तयारी नसल्याचे सांगून सत्ताधाऱ्यांनी मुख्य सभा तहकूब केली. परंतु, बिल्डरची सुपारी घेऊन आंबिल ओढ्यातील अतिक्रमण कारवाई करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आज नियमबाह्य काम केले आहे. सत्ताधारी पक्ष सातत्याने महापालिकेत मनमानी कारभार करून नागरिकांची फसवणूक करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

--------------------------------

Web Title: Authorities also held an online rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.