शिक्षक भरती प्रक्रियेला अधिकाऱ्यांचाच ‘खो’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 07:00 PM2019-01-28T19:00:00+5:302019-01-28T19:01:08+5:30

राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेसाठी प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे.

Authorities 'lost' to teachers recruitment process | शिक्षक भरती प्रक्रियेला अधिकाऱ्यांचाच ‘खो’ 

शिक्षक भरती प्रक्रियेला अधिकाऱ्यांचाच ‘खो’ 

Next

पुणे : शिक्षक भरती प्रक्रियेला विभागातील अधिकाऱ्यांकडूनच खो दिला जात असल्याचे समोर आहे. या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. याबाबत खुद्द शिक्षण आयुक्तांनीच अधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया वेळेत पुर्ण होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेसाठी प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा आढावा शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याकडून घेतला जात आहे. त्यानुसार दि. २९ जानेवारी रोजी या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सोळंकी हे अधिकाऱ्यांशी संवाद साधणार होते. पण या कामात अपेक्षित प्रगती न झाल्याने नाराजी व्यक्त करीत त्यांनी ही आढावा बैठक पुढे ढकलली आहे. आता व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी ते दि. १ व २ फेब्रुवारी रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व महापालिकांचे प्रशासन अधिकारी मनपा यांची बैठक पुण्यात घेणार आहेत. तत्पुर्वी सोळंकी यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. 
भरती प्रक्रियेचे काम वेळेत पुर्ण होणे अपेक्षित असताना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. सर्व संबंधितांना याबाबत वेळोवेळी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. पण योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही. गूगल फॉर्मवर नियमितपणे माहिती अद्यायावत होत नाही. भरलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया निश्चित कालमयार्देत करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत, असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. तसेच बैठकीसाठी कोणत्याही प्रतिनिधीला न पाठविता स्वत: उपस्थित राहण्याच्या स्पष्ट सुचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Authorities 'lost' to teachers recruitment process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.