रेल्वे अर्थसंकल्पाबाबत अधिकारी अनभिज्ञ, प्रवासी संघटनांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 02:15 AM2018-02-02T02:15:50+5:302018-02-02T02:16:04+5:30

रेल्वे अर्थसंकल्पामध्ये काही प्रमुख योजना, प्रकल्पांचाच उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, पुण्यासह रेल्वेच्या विविध विभागांमधील नवीन गाड्या, विद्युतीकरण, दुहेरी-चौपदरीकरणासह अन्य योजनांबाबत अधिकारीही अनभिज्ञ आहेत. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतीही माहिती देण्यास अधिकाºयांनी असमर्थता दर्शविली.

 Authorities of the Railway Budget | रेल्वे अर्थसंकल्पाबाबत अधिकारी अनभिज्ञ, प्रवासी संघटनांची नाराजी

रेल्वे अर्थसंकल्पाबाबत अधिकारी अनभिज्ञ, प्रवासी संघटनांची नाराजी

googlenewsNext

पुणे : रेल्वे अर्थसंकल्पामध्ये काही प्रमुख योजना, प्रकल्पांचाच उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, पुण्यासह रेल्वेच्या विविध विभागांमधील नवीन गाड्या, विद्युतीकरण, दुहेरी-चौपदरीकरणासह अन्य योजनांबाबत अधिकारीही अनभिज्ञ आहेत. गुरूवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत कोणतीही माहिती देण्यास अधिकाºयांनी असमर्थता दर्शविली. याबाबत प्रवासी संघटनांकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
मागील वर्षीपासून केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच रेल्वेचा अर्थसंकल्प समाविष्ट करण्यात आला आहे. पुर्वी स्वतंत्र अर्थसंकल्पामुळे रेल्वेची सर्व माहिती त्याच दिवशी सविस्तरपणे मिळत होती. मात्र, मागील वर्षीपासून अर्थसंकल्पात मोजक्याच ठळक मुद्यांचा उल्लेख केला जात आहे. त्यामुळे कोणत्या राज्याला किती नवीन गाड्या मिळाल्या, सोयी-सुविधा, नवीन योजना, प्रकल्प, मार्गांचे सर्वेक्षण, विद्युतीकरण, चौपदरीकरण, स्थानकांचा विकास याबाबत लाखो प्रवाशांना त्यादिवशी माहिती मिळत नाही. गुरूवारीही अर्थमंत्री अरूण जेटली यांनी रेल्वेबाबत केवळ ठळक मुद्दांचा उल्लेख केला.
रेल्वे अर्थसंकल्पात पुणे विभागाला काय मिळाले, याबाबत अधिकाºयांकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता तेच अनभिज्ञ असल्याचे समजले. अद्याप रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले. रेल्वेच्या योजनांबाबत ‘पिंक बुक’ प्रसिध्द केले जाते. त्यानंतरच सोमवारपर्यंत ही माहिती मिळू शकेल, असे एका अधिकाºयाने सांगितले.

मुंबई पाठोपाठ पुण्यात दैनंदिन प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे, पुण्यात प्रवासी येण्याचा ओघ प्रचंड आहे त्यात पुण्याच्या विस्तरीकरणास मयार्दा आहे आणि आर्थिक दृष्टीने देखील राहणीमान पुण्यात परवडणारे नाही म्हणूनच पुण्याच्या जवळ लोणावळा, दौंड, सासवड ही शहरे राहण्यास लोक पसंत करतात. जसे लोणावळा हे पुण्याचे उपनगर म्हणून प्रस्थपित झाले तसेच दौंड देखील झाले आहे या कडे रेल्वे प्रशासनाने जास्त लक्ष द्याला हवे. या भागात विद्युतीकरण झाले आहे, प्रवासास दीड तास लागतो ज्या प्रमाणे लोणावळा ते पुणे तिसरा व चौथा ट्रॅक करण्यात येणार आहे तसेच पुणे ते दौंड पर्यंत हा प्रकल्प करावा. - विकास देशपांडे,
सचिव, दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघ

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प भाजप सरकारने अचानक बंद केला. त्यामुळे काहीच कळत नाही. पुणे स्टेशनचा २००० साली वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशनचा दर्जा मिळाला. मात्र १८ वर्षांनंतर देखील पुणे स्टेशन वर्ल्ड क्लास होवू शकलेले नाही. यंदाच्या अर्थसंकल्पातही मुंबईवरील प्रेम दिसून आले.
- हर्षा शहा, अध्यक्षा रेल्वे प्रवाशी ग्रृप

Web Title:  Authorities of the Railway Budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.