प्राधिकरण जिमखाना, तिकोने क्रिकेट गुरुकुल संघाचा दुसरा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:10 AM2021-03-06T04:10:12+5:302021-03-06T04:10:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत चौदा वर्षांखालील गटात प्राधिकरण ...

Authority Gymkhana, Tikone Cricket Gurukul team's second win | प्राधिकरण जिमखाना, तिकोने क्रिकेट गुरुकुल संघाचा दुसरा विजय

प्राधिकरण जिमखाना, तिकोने क्रिकेट गुरुकुल संघाचा दुसरा विजय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत चौदा वर्षांखालील गटात प्राधिकरण जिमखाना, तिकोने क्रिकेट गुरुकुल या संघांनी दुसरा विजय मिळवला.

निगडीच्या मदनलाल धिंग्रा मैदानात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात रेहान मन्सुरी (५४ धावा व १-१०) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर प्राधिकरण जिमखाना संघाने किरण क्रिकेट अकादमी संघाचा ७८ धावांनी पराभव केला.

दुसऱ्या सामन्यात निशांत पवार (४२ धावा व २-४) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर तिकोने क्रिकेट गुरुकुल संघाने प्राधिकरण जिमखाना ब्लु संघाचा ८९ धावांनी पराभव करत आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : साखळी फेरी :

प्राधिकरण जिमखाना : २५ षटकांत ६ बाद २३१ धावा (प्रद्युम्न आतपाडकर ६९, शार्दूल कांबळे ५५, रेहान मंसुरी ५४, शिवम मोहिते नाबाद १५, गुंजन सावंत २-२८ वि.वि. किरण क्रिकेट अकादमी : २५ षटकांत ५ बाद १५३ धावा, गुंजन सावंत नाबाद ४६, पार्थ मिश्रा २८, अथर्व बावकर २०, अथर्व सपकाळ १९, रेहान मन्सुरी १-१०, इशांत शुक्ला १-२७; सामनावीर -रेहान मंसुरी; प्राधिकरण जिमखाना संघ ७८ धावांनी विजयी;

तिकोने क्रिकेट गुरुकुल : २५ षटकांत ५ बाद १८५ धावा, अद्वैत कोतवाल ५०, निशांत पवार ४२, तेजस पोळ नाबाद ४१, आरव फाळके ४-३३ वि.वि. प्राधिकरण जिमखाना ब्लू : २४.३ षटकांत सर्व बाद ९६ धावा, आर्यन घोरपडे २२, वेदांत चौधरी १३, आरव फाळके १२, संकुर्ती बाडे ३-१०, निशांत पवार २-४, आदित्य तिकोने २-१४; सामनावीर-निशांत पवार; तिकोने क्रिकेट गुरुकुल संघ ८९ धावांनी विजयी.

Web Title: Authority Gymkhana, Tikone Cricket Gurukul team's second win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.