पुणेकरांनो रिक्षा प्रवास महागणार, पहिल्या दीड किमीसाठी २ रुपये जास्तीचे द्यावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 03:36 PM2021-10-14T15:36:11+5:302021-10-14T15:48:47+5:30

पहिल्या दीड किमीसाठी दोन रुपये तर त्या नंतरच्या प्रत्येक किमींसाठी १ रुपयांची वाढ केली आहे. गुरुवारी पुणे आरटीओने (rto) रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी दिली.

auto rickshaw travel will be expensive for pune residents they will have to pay extra Rs 2 for the first 1.5 km | पुणेकरांनो रिक्षा प्रवास महागणार, पहिल्या दीड किमीसाठी २ रुपये जास्तीचे द्यावे लागणार

पुणेकरांनो रिक्षा प्रवास महागणार, पहिल्या दीड किमीसाठी २ रुपये जास्तीचे द्यावे लागणार

googlenewsNext
ठळक मुद्दे८ नोव्हेंबर पासून नव्या दराची अंमलबजावणी होणार सहा वर्षांनी झाली दरवाढ

पुणे : पुण्यात आता रिक्षाचा (auto rickshaw) प्रवास महागणार आहे. पहिल्या दीड किमीसाठी दोन रुपये तर त्या नंतरच्या प्रत्येक किमींसाठी १ रुपयांची वाढ करण्यात येणार  आहे. गुरुवारी पुणे आरटीओने (rto) रिक्षाच्या दरवाढीस मंजुरी दिली. ८ नोव्हेंबर पासून नव्या दराची अंमलबजावणी होणार आहे. यात पुणे,पिंपरी चिंचवड व बारामती शहरात नवे दर लागू होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या इंधनदारामुळे व खटुवा समितीच्या शिफारसी लागू करण्याची रिक्षा संघटनेच्या मागणीमुळे आरटीओने ह्या दरवाढीस मान्यता दिली. दरवाढी संदर्भात आरटीओ कार्यालयात रिक्षा संघटनेसोबत बैठक देखील पार पडली होती. त्यात भाडेवाढ करण्याचे निश्चित झाले होते. पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात जवळपास ९० ते ९५ हजार रिक्षा आहेत. 

रिक्षा दरवाढ सहा वर्षानंतर 

सध्या पहिल्या दीड किमीसाठी १८ रुपये दर आकारले जात आहे. आता त्यासाठी वीस रुपये द्यावे लागतील. त्या नंतरच्या प्रत्येक किमीसाठी सध्या १२ रुपये दर आहे तो १३ रुपये करण्यात आला आहे. रिक्षा दरवाढ सहा वर्षानंतर झाली असल्याचे रिक्षा फेडरेशनचे बापू भावे म्हणाले तसेच हि दरवाढ गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: auto rickshaw travel will be expensive for pune residents they will have to pay extra Rs 2 for the first 1.5 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.