रिक्षाचालकाने बॅग, लॅपटाप व रोख रक्कम केली प्रामाणिकपणे परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:34+5:302021-01-25T04:12:34+5:30
रिक्षाचालक भरत उत्तेकर यांच्या रिक्षात प्रवासी लेदर बॅग विसरुन गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ती बॅग भवानी पेठेतील रिक्षासंघटनेच्या कार्यालयात ...
रिक्षाचालक भरत उत्तेकर यांच्या रिक्षात प्रवासी लेदर बॅग विसरुन गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ती बॅग भवानी पेठेतील रिक्षासंघटनेच्या कार्यालयात आणून दिली. रिक्षा संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार यांनी प्रवासी नीलेश लाठीग्रा यांना शोधून काढले. प्रवाशी हा गुजरातमधील राजकोट येथील होते. बॅग त्यांचीच असल्याचे सिध्द झाल्यानंतर ती त्यांना प्रा.जे. पी. देसाई, प्रविण तुपे, जयप्रकाश जाधव, आनंदराव साळुंखे यांच्या हस्ते परत दिली. बॅगेत एक लॅपटाप व पन्नास हजार रुपये रोख रक्कम होती. प्रा. देसाई व त्यांचे हडपसर येथील सहकारी कार्यकर्ते रिक्षा संघटनाच्या कार्यालयात डॉ. बाबा आढाव यांना एका कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आले होते. प्रा. देसाई म्हणाले, ही घटना म्हणजे डॉ. बाबा आढाव यांच्या नीतिमूल्यांच्या शिकवणीचे फलित आहे. रिक्षाचालक भरत उत्तेकर, नितीन पवार, ओकार मोरे व रिक्षा संघटनाच्या कार्यकर्त्याचेही त्यांनी कौतुक केले.
फोटो : प्रवीण तुपे, नितीन पवार, रिक्षाचालक भरत उत्तेकर, प्रा. जे. पी. देसाई, प्रवासी नीलेश लाठीग्रा, ओंकार मोरे, आनंदराव साळुंखे आणि जयप्रकाश जाधव.