दहा ते साडे सात हजार बेडची उपलब्धता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:10 AM2020-12-09T04:10:16+5:302020-12-09T04:10:16+5:30
लोकमत न्युज नेटवर्क पुणे : कोरोना रुग्ण आढळण्यापुर्वी शहरात केवळ महापालिकेच्या नायडू रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी दहा बेड उपलब्ध होते. ...
लोकमत न्युज नेटवर्क
पुणे : कोरोना रुग्ण आढळण्यापुर्वी शहरात केवळ महापालिकेच्या नायडू रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी दहा बेड उपलब्ध होते. रुग्ण आढळून आल्यानंतर हा आकडा शंभरपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर ससून रुग्णालयात कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले. महापालिकेने खासगी रुग्णालयांशी करार केले. जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्यात आल्याने बेडची संख्या सुमारे साडे सात हजारांपर्यंत पोहचली. मात्र त्यानंतरही अनेक रुग्णांना आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याच्या तक्रारी होत्या.
शहरामध्ये सुरूवातीला केवळ नायडू रुग्णालयामध्ये कोरोनावर रुग्णांवर उपचार सुरू होते. भारती हॉस्पीटलमध्ये एक कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयांशी करार करून बेड उपलब्ध करून देण्यात आले. ससूनमध्येही सुरूवातीला ३०० बेडची व्यवस्था करण्यात आली. आॅगस्ट महिन्यापासून रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत गेल्याने खासगी रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली. एकुण ८४ रुग्णालयांमधील बेड ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे सप्टेंबरमध्ये एकुण बेडची उपलब्धता ७ हजारच्या पुढे गेली. त्यामध्ये सुमारे ४ हजार आॅक्सिजन बेड व ५५० व्हेंटिलेटर बेडचा समावेश होता. बेड व्यवस्थापनामध्ये समन्वयाच्या अभाव तसेच बेड अनुपल्बधतेमुळे अनेक रुग्णांना वेळेत आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे काही जणांना आपला जीवही गमवावा लागल्याचे प्रकार समोर आले. सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने काही खासगी रुग्णालयांमध्ये अन्य रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
--------------
शासकीय व खासगी रुग्णालयांतील बेडची स्थिती
दिवस एकुण बेड आॅक्सिजनविरहित बेड आॅक्सिजन बेड व्हेंटिलेटरविरहित आयसीयु बेड व्हेंटिलेटर बेड
९ जुलै २९८६ १०२८ १६१२ १२६ २२०
९ आॅगस्ट ५२१५ १६८३ २७७८ ३०५ ४४९
९ सप्टेंबर ६५६७ २२१६ ३४२१ ४४७ ४८३
९ आॅक्टोबर ७५०६ २३१६ ४०५८ ५७९ ५५३
९ नोव्हेंबर ५९०४ १६८० ३३२९ ४२८ ४६७
८ डिसेंबर ५२७२ १५२१ २९४० ३८० ४३१
-------------------------------------------------------