भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात शिरून कोयत्याने केले वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:09 AM2021-04-21T04:09:58+5:302021-04-21T04:09:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या वर्षी झालेल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी घरात शिरून तलवारीने एकावर ...

To avenge his brother's murder, he entered the house with a scythe | भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात शिरून कोयत्याने केले वार

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घरात शिरून कोयत्याने केले वार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या वर्षी झालेल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी घरात शिरून तलवारीने एकावर वार केले. घरातील टीव्ही, कपाटाची तोडफोड केली. रामटेकडी येथील विश्वरत्न मित्र मंडळाजवळ सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला. वानवडी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी राजू एकनाथ थोरात (वय ४४, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैतरसिंग टाक याचा गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये खून करण्यात आला होता. या कारणावरून त्यांचे दोन अल्पवयीन भाऊ हे हत्यारे हवेत फिरवत थोरात यांच्या घराजवळ आले. त्यामुळे लोक घाबरून तेथून पळून जाऊ लागले. थोरात यांच्या शेजारी राहणाऱ्या घरात शिरून या दोघांनी त्यांच्या घरातील साहित्यांची तोडफोड केली. त्यानंतर थोरात यांच्या घरात शिरून ‘मेरे भाई पैतर को तुम सब लोगो ने मिलकर मार डाला. अब मै किसीको जिंदा नही छोडुंगा’ असे म्हणाला. त्यानंतर ते दोघे थोरात यांच्या घरात शिरले. थोरात यांना ‘तेरा लडका किधर है, उसे जिंदा नही छोडुंगा. मेरे भाई के मर्डरमे उसका भी हात है,’ असे म्हणून शिवीगाळ करू लागले. तेव्हा थोरात यांनी ‘माझ्या मुलाने काय केले आहे,’ असे विचारल्यावर त्यांनी हातातील लोखंडी कोयता थोरात यांच्या डोक्यावर जोरात मारला असता, त्यांनी तो हुकवला. तो कोयता घरातील फ्रिजच्या दरवाजाला लागला. ते पाहून त्यांची पत्नी, मेहुणी यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी घरातील टीव्ही, पाण्याचा माट, कपाटाची काच कोयत्याने फोडल्या. त्याचवेळी तेथे पोलीस आल्याचे पाहून कोयता तेथेच टाकून दोघे पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे, भूषण पोटवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: To avenge his brother's murder, he entered the house with a scythe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.