पुणे जिल्ह्यात पावसाने ओलांडली जूनची सरासरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 07:31 PM2018-06-28T19:31:53+5:302018-06-28T19:59:59+5:30

यावर्षी जिल्ह्यातील कमी पावसाच्या पुरंदर, बारामती, इंदापूर पट्ट्यात चांगला पाऊस झाला आहे. अधूनमधून बरसत पावसाने जिल्ह्यात जूनची सरासरी ओलांडली आहे.

average Rainfall over cross in Pune district at June | पुणे जिल्ह्यात पावसाने ओलांडली जूनची सरासरी 

पुणे जिल्ह्यात पावसाने ओलांडली जूनची सरासरी 

googlenewsNext
ठळक मुद्देजून महिन्यात सरासरी १४२.४ मिलिमीटर पावसाची नोंदयावर्षी जिल्ह्यातील कमी पावसाच्या पुरंदर, बारामती, इंदापूर पट्ट्यात चांगला पाऊस

पुणे : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. काही दिवस तो चांगला बरसला मात्र, नंतर गायब झाला. त्यानंतर तो अधूनमधून बरसत राहिला. त्यामुळे या महिन्यात दमदार पाऊस झाला नाही असे वाटत असताना त्याने मात्र या महिन्याची सरासरी ओलांडली आहे. अधूनमधून बरसत पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत १४२.८ पावसाची नोंद झाली आहे. पावसाने धरणसाठ्यात म्हणावी तशी वाढ झाली नसून खरीपाच्या पेरण्यांची परिस्थितीही बरी नाही. जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ पर्यंत १४२.८ मिलिमीटर  (एकूण १,८५६.८ मिलिमीटर) पाऊस झाला आहे. 
विशेष म्हणजे, यावर्षी जिल्ह्यातील कमी पावसाच्या पुरंदर, बारामती, इंदापूर पट्ट्यात चांगला पाऊस झाला आहे. जूनमध्ये बारामतीत ७८.५ मिमी पाऊस होतो. या वर्षी ११०.१ मिलिमीटर झाला आहे. तर, इंदापूरला ९७.२ मिमी नोंद होते, या वर्षी १०४.३  तर पुरंदर तालुक्यात ८८.७ मिमी पाऊस होतो तो या वर्षी १२९.६ मिमी झाला आहे. या महिन्यात हवेली, शिरूर व खेड या तालुक्यांत अद्याप पावसाने सरासरी ओलांडली नाही. मात्र, येथे सरासरीच्या आसपास पाऊस झाला आहे. 
तालुक्यानुसार झालेला पाऊस 
हवेली : ८९.४
मुळशी : २५६.७
भोर : १९७.६
मावळ : २९५.५
वेल्हा : २५४.२
जुन्नर : १0५.६
खेड : ९१.५
आंबेगाव : १२२.0
शिरूर : ५१.८
बारामती : ११0.१
इंदापूर : १0४.३
दौैंड : ४८.३
पुरंदर : १२९.६
एकूण : १८५६.६


 

Web Title: average Rainfall over cross in Pune district at June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.