अवकाGH पावसाने बाजरी भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:09 AM2021-04-16T04:09:59+5:302021-04-16T04:09:59+5:30
वातावरणातील बदलामुळे अवेळी पावसाचे आगमन वारंवार होऊ लागले आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचे वातावरण झाले होते. काल बुधवारी सायंकाळी ...
वातावरणातील बदलामुळे अवेळी पावसाचे आगमन वारंवार होऊ लागले आहे. मागील तीन दिवसांपासून पावसाचे वातावरण झाले होते. काल बुधवारी सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. विजांच्या कडकडाटासह सात वाजेपर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. यावेळी जोरदार वारे वाहत होते. या पावसाने नगदी पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतातील जनावरांचा हिरवा चारा तसेच उन्हाळी बाजरी पीक पावसाच्या तडाख्याने अनेक ठिकाणी सपाट झाले आहे. सध्या कांदा काढणी वेगाने सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी मजुरांच्या सहाय्याने कांदा काढण्याचे काम सुरू केले होते. मात्र पावसामुळे कांदा काढणीत व्यत्यय आला आहे. काही ठिकाणी शेतातील काढून झालेला कांदा पावसाने भिजला आहे. पावसाचे वातावरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला जनावरांचा सुका चारा प्लॅस्टिक कागद टाकून झाकून ठेवला होता. मात्र काही शेतकऱ्यांचा सुका चारा भिजला गेला आहे. यावर्षी आंब्याला चांगला मोहोर आला होता. त्यामुळे हापूस व गावरान आंब्याचे उत्पादन चांगले निघेल असा अंदाज होता. काल पावसाच्या तडाख्याने व वेगवान वाऱ्याने झाडावरच्या कैऱ्या खाली पडल्या आहेत.यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. थोडावेळ पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. काही शेतकऱ्यांचे गहू पिकाचे नुकसान झाले आहे. वारंवार अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
-
फोटो क्रमांक : १५ मंचर पावसाने बाजरी भुईसपाट
फोटोखाली: अवकाळी पावसाच्या तडाख्याने उन्हाळी बाजरी पीक भुईसपाट झाले आहे.