अटक टाळण्यासाठी ‘तो’ भोंदू रुग्णालयात

By Admin | Published: December 4, 2014 05:01 AM2014-12-04T05:01:28+5:302014-12-04T05:01:28+5:30

ओळखीचा फायदा घेऊन २२ वर्षीय तरुणीवर गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी बदनामीची व जिवे मारण्याची धमकी दाखवीत बलात्कार

To avoid arrest, 'he' is in a bizarre hospital | अटक टाळण्यासाठी ‘तो’ भोंदू रुग्णालयात

अटक टाळण्यासाठी ‘तो’ भोंदू रुग्णालयात

googlenewsNext

चाकण : ओळखीचा फायदा घेऊन २२ वर्षीय तरुणीवर गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी बदनामीची व जिवे मारण्याची धमकी दाखवीत बलात्कार करणाऱ्या आळंदी (ता. खेड, जि. पुणे) येथील भोंदूला प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल केल्याने अद्याप अटक करण्यात आलेली नाही. दोन दिवसांत त्याला अटक करण्यात येणार असल्याचे चाकण पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ह.भ.प. शिवदास शेणगावकर (वय ३५, रा. आळंदी, ता. खेड , जि. पुणे) असे कीर्तनकार भोंदूचे नाव असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याबाबत चाकण पोलिसात रविवारी (दि. ३०) संबंधित पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवदास शेणगावकरने चाकणमध्ये राहणाऱ्या या युवतीवर गेल्या काही महिन्यांपासून आळंदी , यवतमाळ येथे नेऊन वेळोवेळी बलात्कार केला. सततच्या या प्रकारांना कंटाळून अखेर पीडित युवतीने चाकण पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर शेणगावकरने अटकेच्या भीतीने प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण पुढे करीत रुग्णालयात दाखल होणे पसंत केल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र येत्या दोन दिवसांत त्यांना गजाआड करणार असल्याचे स्पष्ट केले.
याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. बी. पाटील यांनी सांगितले, की या घटनेच्या मुळाशी जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न असून, या घटनेमागे आणखी काही दडले आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. संबंधित पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला असून, पुढील सुरू आहे. सहायक निरीक्षक किशोर पाटील यांनी सांगितले, की शिवदास शेणगावकर सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत त्यांना अटक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: To avoid arrest, 'he' is in a bizarre hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.