ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:29+5:302021-07-27T04:10:29+5:30

माझ्या वकिली व्यवसायामध्ये मी अशा अनेक केसेस हाताळल्या आहेत की ज्याच्यामध्ये लोक अनावधानाने किंवा हलगर्जीपणामुळे सायबर फ्राॅडला बळी पडले ...

To avoid online fraud ... | ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी...

ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी...

Next

माझ्या वकिली व्यवसायामध्ये मी अशा अनेक केसेस हाताळल्या आहेत की ज्याच्यामध्ये लोक अनावधानाने किंवा हलगर्जीपणामुळे सायबर फ्राॅडला बळी पडले आहे. उदाहरणार्थ :

1. Payment Frauds : बँकेच्या खात्यातून किंवा पेमेंट ॲपमधून पैसे परवानगीशिवाय काढले गेले.

२. फिशिंग र्इमेल्स : ब-याच वेळेला आपल्याला आयकरचा परतावा मिळेल किंवा विमा पॉलीसीचे रिन्यूअल करायला पाहिजे किंवा तुमचे खाते बंद झाले आहे, असा इमेल येतो जो अधिकृत सोर्स किंवा कंपनीकडून आलेला नसून हा एक फिशिंग अॅटॅक असतो. या पद्धतीने तुमची गोपनीय माहिती म्हणजे ओटीपी, आयडी, पासवर्ड वगैरे अनधिकृतपणे मिळवायचा प्रयत्न केलेला असतो. अशा फिशिंग ॲटॅकला बळी पडून लोकांची गोपनीय माहिती किंवा पैसे गुन्हेगाराच्या हातात पडू शकतात .

३. सायबर स्टॉकिंग/हरॅसमेंट/ सेक्शुयल हरॅसमेंट : खोट्या नावाने एखाद्या सोशल मीडिया किंवा प्लॅटफॉर्मवर खातं काढून महिलेचा किंवा नाबालिक मुलींचा पाठलाग करून किंवा त्यांना फसवून त्यांच्याकडून त्यांची खासगी माहिती किंवा फोटो मिळवणे किंवा त्यांचे लैंगिक शोषण करणे असे प्रकार घडण्याचे प्रमाण खूप जास्त आहे.

सायबर गुन्ह्यांचा आवाका खूप मोठा आहे आणि त्याचा वापर करणा-याने सतर्क आणि सुरक्षित रहाणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी सतत प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नाही. सुरक्षित राहण्यासाठी काही साध्या सोप्या टिप्स :

१. इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक माहितीवर विश्वास ठेवू नये. ती माहिती, मेसेज, लिंक किंवा इमेल हे योग्य आहे की नाही याची खात्री पटल्यानंतरच त्याचा वापर करावा.

२. आपली गोपनीय माहिती कुणाबरोबरही शेअर करू नये

३. आपला पासवर्ड हा सहजसोप्या रितीने ओळखता येईल असा नसावा.

४. आपल्या फोनवर व्हायरस अथवा मालवेअर नसेल याची खबरदारी घ्यावी. त्यासाठी आपल्या फोनवर अँटिव्हायरस सॉफ्टवेअर असणे गरजेचे आहे.

५. पेमेंट ॲप वापरताना सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणत्याही ति-हाईत इसमाला आपले पासवर्ड अथवा ओटीपी कधीही शेअर करू नये. कोणताही व्यवहार करताना ति-हाईत इसमाने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नये.

६. कुठलेही पेमेंट ॲप आपल्या मुख्य बँक अकांउटला लिंक करू नये. असे केल्यास त्या अकांउटमध्ये जास्तीचे पैसे नाही अशी खबरदारी घ्यावी.

७. ऑनलाइन माध्यमामध्ये वावर करत असताना कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, दुप्पट पैसे, भरपूर पगाराची नोकरी, भरपूर कमाई होईल असे बिझनेस रिफंड किंवा लॉटरी स्कीम्स अशी अनेक प्रलोभने या माध्यमात आपल्याला आढळतील त्यावर विश्वास ठेवू नये. आपण ज्याकाही सर्व काळज्या आपल्या ख-या म्हणजे नॉन डिजिटल जगामधल्या व्यवहारांमध्ये घेत असतो तशाच काळजीपूर्वक पद्धतीने ऑनलाइन जगामधला आपला वावर असायला पाहिजे. ऑनलाइन सेफ्टी ही आपसूक घडणारी बाब नसून प्रत्येक व्यक्तीने प्रयत्नशील पद्धतीने करायची गोष्ट आहे. त्यासाठी अवेअरनेस हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर योग्य त्या टुल्स आणि टेकनिक्सचा वापर करायचा आहे.

ऑनलाइन सेफ्टीची सवय लावून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वेबसाईट ॲप गेम्स पेमेंट ॲप हे सुरक्षितपणे कसे वापरता येईल याची सूचना जाणून घ्यायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच आपला सायबर स्पेसमधला अनुभव हा सुरक्षित आणि सुखदायी होऊ शकतो.

- ॲड. वैशाली भागवत

Web Title: To avoid online fraud ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.