होम आयसोलेशनमध्ये दमवणारे व्यायाम नकोच, वारंवार तपासणी गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:11 AM2021-04-22T04:11:43+5:302021-04-22T04:11:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवणे म्हणजे खरे तर रुम आयसोलेशन असते. या रुग्णाशी कोणत्याही ...

Avoid strenuous exercises in home isolation, requiring frequent checkups | होम आयसोलेशनमध्ये दमवणारे व्यायाम नकोच, वारंवार तपासणी गरजेची

होम आयसोलेशनमध्ये दमवणारे व्यायाम नकोच, वारंवार तपासणी गरजेची

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवणे म्हणजे खरे तर रुम आयसोलेशन असते. या रुग्णाशी कोणत्याही प्रकारे इतरांचा संपर्क टाळायला हवा. त्याचबरोबर दमवणारे व्यायायम करू नये, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

* होम आयसोलेशन याचा अर्थ रुग्णाची स्थिती तुलनेने बरी आहे, पण त्याच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून वेगळे राहणे.

* * दीर्घ श्वसन करून ऑक्सिजनची पातळी ९० वरून ९३- ९४ पर्यंत जात असेल तर ठीक, पण ती ९० पेक्षा खाली जात असेल तर लगेच वैद्यकीय सल्ला घेतलाच पाहिजे. ही तपासणी दिवसातून किमान तीन वेळा झाली पाहिजे.

* होम आयसोलेशन मध्ये तापाचे प्रमाणही किमान तीन वेळा मोजायला हवे. ते १००. ०५ असेल तर साध्या गोळीने कमी होऊ शकतो, पण त्यापेक्षा जास्त झाला तर वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.

* रुग्णाला खूप अशक्तपणा येत असेल तर तो वेळेवर खाणे घेईल याची काळजी घ्यायला हवी. विशेषतः आधीचे आजार असलेल्या रुग्णांच्या बाबतीत हे महत्वाचे.

* रुग्णाची आधीची सुरू असलेली औषधे व विलगीकरण करताना दिलेली औषधे, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणातच घ्यायला हवीत. अनेकांना मनानेच प्रमाण कमीजास्त करण्याची किंवा काही गोळ्या कडू आहेत म्हणून बंद करण्याची इच्छा होते, पण ते रुग्णासाठी घातक आहे.

* विलगीकरणातील रुग्णाने पूर्ण विश्रांती घेण्याची गरज असते. त्यामुळे दमवणारे कोणतेही व्यायाम करू नयेत. फार तर आखडलेले सांधे मोकळे करणारे बोटांचे, पाय हलवण्याचे प्रकार चालतात.

* या काळात पालथे म्हणजे पोटावर पडून केलेले श्वसन उपयोगी पडते. कारण या अवस्थेत फुफुस्साचे कमाल प्रसरण होत असते.

डॉ. सदानंद बोरसे

शल्यक्रिया विशारद

---//

* एकाच डॉक्टरकडे रुग्णाला दाखवणे असावे. डॉक्टर बदलण्याची आपल्याकडे फार सवय असते. हा काही साधा सर्दी-खोकला नाही तर विषाणूमुळे येणारा आहे. त्याचे निदान करण्यासाठी व त्यांनतर औषधाचा गुण येण्यासाठी डॉक्टरांना किमान वेळ द्यायला हवा.

* होम आयसोलेशनमध्ये टेलिकन्सलटंटची गरज कधीही लागू शकते. त्यामुळे ती व्यवस्था नातेवाईकांनी करून ठेवावी

* रुग्णांच्या प्रकृतीतील चढ-उतारांची नोंद ठेवणे गरजेचे आहे. डॉक्टरांना तर त्याचा उपयोग होतोच. शिवाय नोंद करताना आधीपेक्षा लक्षणीय असे काही आढळले तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधता येतो.

* रुग्णाला या काळात औषधांचा हेवी डोस दिला जातो. त्यामुळे हलका आहार घेण्याची गरज असते. सर्दी, खोकला होईल अशी कोणतीही गोष्ट घेऊ नये. आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज असते.

* होम आयसोलेशन म्हणजे खरे तर रुम आयसोलेशन आहे. रुग्णाने त्या खोलीच्या बाहेरच यायला नको. एकच बाथरूम असेल तर रुग्णाच्या वापरानंतर ते सॅनिटाईज करून अर्धा तास विनावापर ठेवावे व नंतरच इतरांनी वापरावे.

* रुग्णाच्या वापरात शक्यतो डिस्पोजल गोष्टीच द्याव्यात. हा सगळा कचरा अन्य कचऱ्र्यात न मिसळता स्वतंत्रपणे नष्ट करावा.

डॉ. विनीत राव

कन्सल्टिंग फिजीशियन

Web Title: Avoid strenuous exercises in home isolation, requiring frequent checkups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.