लग्नाचा खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:24 AM2019-02-21T00:24:58+5:302019-02-21T00:25:17+5:30

राजुरी (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर बारकू गटकळ यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात त्यांनी सत्कार करणे

Avoiding wedding expenses, helping social organizations | लग्नाचा खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत

लग्नाचा खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत

Next

राजुरी : येथील ज्ञानेश्वर गटकळ यांनी आपल्या मुलाचा लग्नामधील सत्कारावरचा खर्च टाळून सामाजिक संस्थांना मदत केली. त्यांनी ९७ हजार रुपयांची तीन सामाजिक संस्थांना केले.

राजुरी (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर बारकू गटकळ यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात त्यांनी सत्कार करणे, वरात यावर होणारा खर्च टाळून राजुरी येथील गरीब लोकांसाठी मोफत अन्नदान करणारी संकल्प बहुउद्देशीय अन्नपूर्णा संस्थेला २१ हजार रुपये व पुणे येथे असलेली समुवेदना या संस्थेला २५ हजार रुपये व गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विद्यार्थी सहायक समितीला ५१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश तिन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे राजुरी गावचे माजी सरपंच माऊली शेळके, युवानेते वल्लभ शेळके, जाणकू डावखर, ज्ञानेश्वर गटकळ, जी. के. औटी, डॉ. दिलीपकुमार ताजवे, अशोक गटकळ, दिगंबर हाडवळे यांच्या हस्ते
देण्यात आला.
 

Web Title: Avoiding wedding expenses, helping social organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे