पाण्यासाठी जागरण
By Admin | Published: September 5, 2015 03:32 AM2015-09-05T03:32:56+5:302015-09-05T03:32:56+5:30
शहराच्या पाण्यामध्ये ३० टक्के कपात करून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून शहराला केल्या
पुणे : शहराच्या पाण्यामध्ये ३० टक्के कपात करून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून शहराला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये रेंजहिल्स, मरिआई गेट परिसर, पुणे विद्यापीठ परिसर, पंचवटी, पाषाण परिसराला रात्री ११ ते पहाटे ३ या वेळेत पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना जागरणं करावी लागणार आहेत.
शहराला स्वारगेट, लष्कर, पर्वती, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर, वडगाव या केंद्रांमार्फत पाणीपुरवठा केला जातो. सोमवार, बुधवार व शुक्रवारी वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा होणार भाग : बंडगार्डन विभागात येरवडा, कलवडवस्ती, आळंदी रोड, कल्याणीनगर, विमाननगर, कोरेगाव पार्क, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, मंगळवार पेठ यांना पूर्वीप्रमाणेच वेळेत पाणीपुरवठा होईल.
चंदननगर, वडगावशेरी, चौधरी वस्ती, थिटेनगर, खुळेवाडी, खराडकर पार्क, अभिरुची मॉल, हिंगणे परिसर, आपटे कॉलनी, खंडोबा परिसर, धायरी, डीएसके पायथा, साळुंखे विहार, कुदळे पार्क, विक्रांत पॅलेस, गोविंद अपार्टमेंट, विठ्ठलवाडी, महालक्ष्मी सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, मारुतीनगर, माणिकबाग या परिसरामध्ये वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा होईल.
मंगळवार, गुरुवार व शनिवारी पाणीपुरवठा होणारा भाग : स्वारगेट जलकेंद्रातील दांडेकर पूल, सर्व पेठा, राजाराम पुलाच्या अलीकडील भाग यांना सकाळी ५ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा होणार आहे. लष्कर विभागात मगरपट्टा, केशवनगर, मुंढवा, महंमदवाडी, वानवडी, कोंढवा गावठाण, कॅम्प, ससून हॉस्पिटल येथे पूर्वीप्रमाणेच वेळेत पाणीपुरवठा होईल. एसएनडीटी विभागामध्ये रामबाग कॉलनी, काशीनाथ सोसायटी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमाननगर या परिसरात सकाळी ५ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा होईल. कोथरूड गावठाण, डहाणूकर कॉलनी, गुजराथ कॉलनी, करिश्मा सोसायटी, मयूर कॉलनी, नळस्टॉप, सुतारदरा, कर्वेनगर कॅनॉल, म्हाडा वसाहत, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, सहकारनगर पोलीस स्टेशन परिसर, शिवाजीनगर गावठाण, बोपोडी, औंध रोड, कामगार पुतळा येथील परिसरामध्ये वेगवेगळ्या वेळांमध्ये पाणीपुरवठा होणार आहे.