दिव्यांगाचे अपंग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:06 AM2021-01-01T04:06:40+5:302021-01-01T04:06:40+5:30
दिव्यांगाचा कायदा २८ डिसेंबर २०१६ रोजी मंजूर करण्यात आला. कायदा मंजूर होऊन चार वर्ष उलटले तरी अद्यापही कायद्याची अंमलबजावणी ...
दिव्यांगाचा कायदा २८ डिसेंबर २०१६ रोजी मंजूर करण्यात आला. कायदा मंजूर होऊन चार वर्ष उलटले तरी अद्यापही कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. सरकारला जागे करण्यासाठी अपंग बांधवांच्या वतीने धर्मेंद्र सातव यांचे नेतृत्वाखाली अंपग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. दरम्यान आंदोलन स्थळी अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदन देऊन तात्काळ अपंग कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जीवन टोपे, ज्ञानदेव मेहेञे, सुरेश जगताप, फिरोज पठाण, बाळासाहेब काळभोर, साहेबराव जगताप, दत्तात्रय ननावरे, मिना धोत्रे, योगेश राऊत, अनिता कांबळे, रेश्मा कडलक, बाळू काळभोर उपस्थित होते.
--
३१आव्हाळवाडी दिव्यांग
फोटो ओळ : अपंग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करताना दिव्यांग बांधव