Video: पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 01:11 PM2021-11-10T13:11:01+5:302021-11-10T18:53:42+5:30
एसटी प्रशासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मान्यता दिल्याच्या विरोधात केले आंदोलन (ST Strike)
पुणे : राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीनंतर संप पुकारला आहे. गावी गेलेल्या लोकांचे संपामुळे प्रचंड हाल होऊ लागले आहेत. तसेच एसटी प्रशासनाला कोट्यावधीचा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची मान्यता दिली आहे. या निर्णयाविरोधात पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर कर्मचाऱ्यांनी जागरण गोंधळ आंदोलन केले आहे. राज्य सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करावा आणि आमचे विलीनीकरण करावे अशी मागणी आंदोलकांकडून जोर धरू लागली आहे.
शासनाच्या अधिसूचनेच्या अधीन राहून पुणे शहरातील एस.टी बस स्थानकांमधून खाजगी बसेसद्वारे सकाळी ६ वाजल्यापासून प्रवासी वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. खाजगी बस वाहतूकदारांनी एस.टी. प्रशासनाकडून सध्याच्या एस.टीच्या प्रचलीत भाडेदरांप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आली आहेत.
पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांचे जागरण गोंधळ आंदोलन#msrtc#Punepic.twitter.com/a01eiBoOjN
— Lokmat (@lokmat) November 10, 2021
पुणे महानगर परिवहन महामंडळच्या बसेस जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीशेजारील ग्रामीण भागांमध्येदेखील सोडण्याच्या पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना सूचना आहेत. प्रवाशांनी आवश्यकतेनुसार या सुविधेचा लाभ घेण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी असे आवाहन केले आहे.
प्रवाशांना बसत होता फटका
एसटी कर्मचाऱ्यांनी संपास सुरुवात केल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिवाळीत झालेली भाडेवाढ सहन करीत एसटीचा प्रवासी पुन्हा एसटीने प्रवास करण्यास इच्छुक आहे. मात्र संपामुळे त्याची मोठी गैरसोय होत आहे. त्याला दुप्पट व तिप्पट दर देऊन ट्रॅव्हल्सने प्रवास कराव लागत असल्याने मोठा फटका बसत होता.
एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका
एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरणाची मागणी पूर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असताना संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यांत जवळपास १२० पेक्षा जास्त डेपोत सध्या संप सुरू आहे. त्यामुळे एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका बसत आहे.