कीर्तनातून होते प्रबोधन आणि समुपदेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:55+5:302020-12-11T04:27:55+5:30

पुणे : कीर्तन हे भक्तीभाव व प्रबोधनाचे पवित्र आणि समृद्ध माध्यम आहे. मानसशास्त्राला जे जमले नाही, ते कीर्तन परंपरेने ...

Awakening and counseling were through kirtan | कीर्तनातून होते प्रबोधन आणि समुपदेशन

कीर्तनातून होते प्रबोधन आणि समुपदेशन

Next

पुणे : कीर्तन हे भक्तीभाव व प्रबोधनाचे पवित्र आणि समृद्ध माध्यम आहे. मानसशास्त्राला जे जमले नाही, ते कीर्तन परंपरेने करुन दाखवले. कोविड काळात कीर्तन हे समुपदेशनाचे महत्वाचे साधन म्हणून उपयुक्त ठरले, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी यांनी व्यक्त केले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी आणि सेवा मित्र मंडळातर्फे पुणे कीर्तन महोत्सवाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर यांना कीर्तन कोविद कमलाकर बुवा औरंगाबादकर स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी मंगलमूर्ती औरंगाबादकर, शाहीर हेमंतराजे मावळे, शिरीष मोहिते, प्रा. संगिता मावळे उपस्थित होते.

डॉ. उमराणी म्हणाले, आपले ज्ञान समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून करीत आहेत. कीर्तनाची परंपरा तरुणाईपर्यंत पोहोचायला हवी. समाजाला ताकद देण्याची क्षमता कीर्तनासारख्या कलांमध्ये आहे. प्रबोधन, शिक्षण आणि समुपदेशनासाठी कीर्तन परंपरा गरजेची आहे.

मोरेश्वरबुवा जोशी चऱ्होलीकर म्हणाले, कीर्तन क्षेत्रात कितीही काम केले, तरी कमीच आहे. समाजाला कीर्तनातून प्रबोधनाची गरज आहे. समाजाने खऱ्या अर्थाने वंदन केलेली कीर्तनाची गादी आहे, ती आपण जपायला आणि वाढवायला हवी.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, नारदीय कीर्तन वैभवापर्यंत नेणे, हा आमचा उद्देश आहे. आज अनेक कलांना व्यासपीठ उपलब्ध नाही. त्यामुळे कीर्तनाला व्यासपीठ देण्यास कीर्तन महोत्सव आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. कीर्तन महोत्सवात संत शिरोमणी नामदेव महाराज सार्ध सप्तशती जयंती वर्ष समारोपाच्या निमित्ताने यंदा राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळे यांनी संत नामदेव विजय यात्रा आपल्या कीर्तनातून सांगितली. होनराज मावळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Awakening and counseling were through kirtan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.