कळंबमध्ये जागरण गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:22+5:302021-05-22T04:10:22+5:30

वालचंदनगर : इंदापूरचे हक्काचे पाणी रद्द करण्यात आले. उजनी धरण निमार्णासाठी हजारो एकर जमीन देणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना ...

Awakening confusion in Kalamb | कळंबमध्ये जागरण गोंधळ

कळंबमध्ये जागरण गोंधळ

Next

वालचंदनगर : इंदापूरचे हक्काचे पाणी रद्द करण्यात आले. उजनी धरण निमार्णासाठी हजारो एकर जमीन देणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या सरकारचा शेतकरी कृती समितीच्या वतीने जागरण गोंधळ घालून जाहीर निषेध करत असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व कळंबा ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांनी दिली.

सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणा-या नीरा नदीवरील कळंबोलीच्या पुलावर अनेक शेतकरी व युवकांनी आंदोलन करीत पाणी रद्द आदेशाचा निषेध केला व रस्त्यावर जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला. कळंब ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली युवा शेतकऱ्यांनी जागरण गोधंळ घालून रास्ता रोको आंदोलन केले. कळंब वालचंदनगर परिसरातील युवकांनी नीरा नदीच्या पुलावर ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या अनोख्या आंदोलनात जागरण गोंधळ घालण्यात आला. यामध्ये ‘सरकारला सुबुद्धी दे, शेतकऱ्यांना न्याय मिळू दे’ असे देवाला साकडे घातले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनीच्या पाण्याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी केली. यावेळी अतुल सावंत, संदीप पाटील, महेश बोंद्रे, संजय खरात, देविदास केदार, पंकज डोंबाळे, विनोद वरुडकर, गणेश लंबाते, सागर खरात, बबलू लकडे, संजय निटवे, भालचंद्र काटकर आदी युवा शेतकरी उपस्थित होते.

-------------------------

फोटो ओळी : कळंबोली येथील नीरा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ घालत युवा शेतक-यांनी उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी आदेश रद्द केल्याबद्दल आंदोलन केले.

२१०५२०२१-बारामती-१८

------------------------

Web Title: Awakening confusion in Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.