एप्रिलमध्ये विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ
By admin | Published: March 22, 2017 03:20 AM2017-03-22T03:20:42+5:302017-03-22T03:20:42+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केला असून
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आयोजित केला असून पदव्युत्तर व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांकडून मंगळवारपासून आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना येत्या ४ एप्रिलपर्यंत पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतील.
विद्यापीठास्तरावर पदवीप्रदान समारंभ वर्षातून दोन वेळा आयोजित केला जातो. त्यातील पहिला पदवीप्रदान दिवाळीपूर्वी झाला असून आता दुसरा पदवी प्रदान समांरभ एप्रिल महिन्यात घेण्याचे नियोजन केले आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील पदवी प्रदान समांरभात प्रमाणपत्राचे वितरण केले जाईल. तर पदवी स्तरावरील प्रमाणपत्रे संबंधित महाविद्यालयांमध्ये दिली जातील. विद्यार्थ्यांना येत्या ४ एप्रिलपर्यंत विनाविलंब शुल्कासह अर्ज करता येईल. तर ५ ते १२ एप्रिल या कालावधीत विद्यापीठाकडून विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जातील. आॅनलाईज अर्जासोबत अंतिम वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.
पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांनी आधार
क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. आधार क्रमांक असल्यास विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे शक्य होणार आहे. मात्र, सध्या आधार क्रमांक बंधनकारक केलेला नाही. परंतु, यापुढील काळात आधार क्रमांक अनिवार्य केला जाणार आहे.