Swachh Bharat Abhiyan: स्वच्छता अभियानात लोणावळा, सासवड नगरपालिकेला पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 06:41 PM2021-11-17T18:41:54+5:302021-11-17T18:45:33+5:30
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ , सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरे यांचे निकाल ९ नोंव्हेबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले. (Swachh Bharat Abhiyan)
पुणे: केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवड नगरपालिकेला पहिल्या तीन मध्ये पुरस्कार पटकावला आहे. याशिवाय जुन्नर ,शिरूर, सासवड, लोणावळा, जेजुरी, इंदापूर या नगर परिषदांनी कचरामुक्त शहरे होण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ , सफाईमित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरे यांचे निकाल ९ नोंव्हेबर २०२१ रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये पुणे जिल्ह्यातील लोणावळा व सासवड या शहरांना देशपातळीवर पुरस्कार प्राप्त झाला असून, राष्ट्रपतींच्या हस्ते २० नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, लोणावळा, सासवड, जेजुरी, इंदापूर या शहरांनादेखील कचरा मुक्त शहरे म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे पुरस्कृत करण्यात येणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत लोणावळा नगरपरिषदेची कामगिरी -
लोणावळा शहर हे पर्यटन शहर म्हणून पश्चिम महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असे हील स्टेशन आहे. पर्यटक यांचेमुळे होणारा कचरा हा शहराचा मोठा प्रश्न होता. परंतु यास लोणावळा नगरपरिषदेने मोठ्या प्रमाणात जनजागृती करून दंड लावून तसेच प्रत्येक व्यापारी , पर्यटन व सार्वजनिक ठीकानी लीड चे झाकण असलेले ट्वीन बिन लावले आणि शहरात पडणारा कचरा कमी करण्यास मदत झाली. लोणावळा शहरात घरगुती कचरा हा वेगळा केला जातो. ओला, सुका घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सेनिटरी कचरा विलगीकृत घेतला जातो. कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे १००% आहे. शहरातील नागरिक हे स्वत:ही घरचे घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात.
सासवड नगरपरिषदेचे काम
- घरोघरी जाऊन वर्गीकरण ओला व सुका कचरा १०० टक्के संकलित केला जातो. प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी अल्पदरात पुर्नवापर योग्य कापडी पिशवी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सासवड शहरातील Legacy Waste बाबत प्रभावी अंमलबजावणी करून सदर कच-यावर १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्याकामी विविध मोहिम राबविल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये जागृकता निर्माण झाली.
लोक सहभाग आणि प्रशासनाचे एकत्रित यश
स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये स्वच्छतेची खूप कामे करण्यात येत आहे. यामुळेच जुन्नर ,शिरूर ,सासवड ,लोणावळा ,जेजुरी ,इंदापूर या नगर परिषदांनी कचरामुक्त शहरे होण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना गौरविण्यात येणार आहे. यासाठी सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी,नगराध्यक्ष ,सर्व अधिकारी –कर्मचारी आणि सर्व नागरिकांचे या यशाबद्दल अभिनंदन.
डाॅ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी