माधुरी काकडे यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:14 AM2021-09-16T04:14:28+5:302021-09-16T04:14:28+5:30
शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी यावर्षीचा स्मार्ट टीचर पुरस्कार प्राप्त झाला आहे. आगाज ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, ...
शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्यासाठी यावर्षीचा स्मार्ट टीचर पुरस्कार प्राप्त झाला आहे. आगाज ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणासाठी वापर असे विविध उपक्रम राबविणाऱ्या ऑनलाइन टीचिंग करणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक चर्चेत सहभाग घेणाऱ्या, तसेच टाकाऊतून टिकाऊ अशा विविध उपक्रमांत कार्य करणाऱ्या देशातील विविध शिक्षकांना स्मार्ट टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातून एक किंवा दोन शिक्षकांची निवड होते. मुख्य प्रवर्तक अमित चौधरी, हेमन उपाध्याय, माजी सुभाष राबरा, संस्थापक अध्यक्षा श्रीमती स्मृती चौधरी, उत्तर प्रदेश राज्य समन्वयक नाना पाटील यांनी माधुरी काकडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांचे कविता, कथा, निबंध, हायकू, लावणी, गझल, नाट्यलेखन अशा सर्व साहित्य क्षेत्रांत सातत्याने लेखन सुरू आहे.
१५ दौंड काकडे