अश्विनी दीक्षित यांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:15+5:302021-09-21T04:11:15+5:30
राज्यातील उपक्रमशील शिक्षकांसाठी वेगवेगळ्या गटातून नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नावीन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ...
राज्यातील उपक्रमशील शिक्षकांसाठी वेगवेगळ्या गटातून नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. नावीन्यपूर्ण उपक्रमातून शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून अनेक शिक्षक सहभागी झाले होते. अश्विनी दीक्षित यांनी माध्यमिक गटातून अध्यापनात रेडिओ केंद्राचा वापर (विद्यार्थी आकाशवाणी पथक) या विषयावर आपला उपक्रम सादर केला होता. त्यांच्या या उपक्रमाला राज्यातून सातवा क्रमांक मिळाला आहे. त्यामुळे दीक्षित यांची शिक्षक ध्येय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, समन्वयक प्रशांत तनपुरे, संस्थेतील विविध विभागातील विभाग प्रमुख व मुख्याध्यापक सूर्यकांत मुंडे, संतोष वाघ, अमोल घोडके, रेडिओ केंद्र प्रमुख सुनील शिर्शिकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. तसेच समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
फोटो : अश्विनी दीक्षित
२००९२०२१-बारामती-०२
--------------------------