रामचंद्र धादवड, सीमा काकडे यांना पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:47+5:302021-09-24T04:13:47+5:30
घोडेगाव येथे शंकरराव विठू केंगले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी किसान सभा आंबेगाव तालुका समितीच्या वतीने ...
घोडेगाव येथे शंकरराव विठू केंगले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी किसान सभा आंबेगाव तालुका समितीच्या वतीने यावर्षीपासून प्रथमच या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी, अशोकराव काळे, विलास केंगले, सुभाष भोकटे, शिवराम केंगले, अमोल अंकुश, बाळासाहेब कानडे, बुधाजी डामसे, गौतम खरात, रामकृष्ण बोऱ्हाडे, डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर, डॉ. अमोल वाघमारे, अशोक पेकारी, राजू घोडे, कृष्णा वडेकर आदी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावर्षीचा पुरस्कार निर्सगवासी रामचंद्र धादवड यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत आदिवासी प्रश्नांची सोडवणूक व्हावी म्हणून काम केले, तर सीमाताई काकडे रोजगार हमी कायदयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्यभर फिरून लोकांमध्ये जाणीजागृतीचे काम करत आहेत. रामचंद्र धादवड हयात नसल्याने त्यांचा पुरस्कार त्यांचा मुलगा विष्णू धादवड यांनी, तर सीमाताई काकडे आजारी असल्याने त्यांचा पुरस्कार नंदा मोरमारे यांनी स्वीकारला.
शंकरराव विठू केंगले यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जात आहे.ते सन १९६१ ते १९७८ दरम्यान ठाणे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी आदिवासी समुदायाचे प्रश्न आणि प्रशासनाची दुर्लक्षाची भावना पाहून आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ते घोडेगाव येथे कायमचे रहिवासी झाले. सन १९७८ ते १९९५ या काळात त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कामात स्वतःला झोकून दिले होते. यामध्ये त्यांनी हिरड्याच्या भाववाढीसाठी आंदोलने केली. पुणे येथून घोडेगाव येथे प्रकल्प कार्यालय आणण्यासाठी प्रयत्न केले. “आधी पुनर्वसन मग धरण ” अशी भूमिका घेऊन लढा उभा केला. भीमाशंकर अभयारण्य विरोधातील लढा असे अनेक लढे व समाजासाठी त्यांनी काम केले. या दरम्यान त्यांनी पंचायत समिती आंबेगाव येथील सभापती पद भूषवलेले आहे. यांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी व त्यांचा विचार आणि कार्य हे चिरंतन राहून वर्तमानात सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या कार्यकर्त्यांना सन्मानित करणे या भूमिकेतून हा स्मृती पुरस्कार किसान सभेच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.
फोटो :