साईनाथ पाचारणे यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:36+5:302021-03-05T04:10:36+5:30
अखिल भारतीय स्तरावरून आलेल्या पुस्तकांमधून पाच कवींची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात प्राध्यापक साईनाथ पाचारणे ...
अखिल भारतीय स्तरावरून आलेल्या पुस्तकांमधून पाच कवींची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात प्राध्यापक साईनाथ पाचारणे यांचा समावेश आहे.
त्यांच्या या काव्यसंग्रहाला आत्तापर्यंत गुहागर येथून देण्यात येणाऱ्या ‘पसायदान’ या पुरस्कारासह विविध ठिकाणचे ८ पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय स्तरावरून सन्मानित होण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे. या आधी पणजी (गोवा) येथे त्यांना नॅशनल लिटरेचर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. तसेच बडोदा (गुजरात), डलहौसी (हिमाचल प्रदेश) या ठिकाणीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. प्रा. साईनाथ पाचारणे यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांनी विनोदी साहित्य बाल साहित्य व अनुवाद क्षेत्रात उत्तम कार्य केले आहे. आजपर्यंत त्यांची दोनशेपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहे.