बाबेल यांना शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:09 AM2021-09-25T04:09:32+5:302021-09-25T04:09:32+5:30
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ, नागपूर विभाग, नागपूर यांच्या वतीने कर्तृत्ववान शिक्षकरत्न राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नागपूर येथे ...
विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ, नागपूर विभाग, नागपूर यांच्या वतीने कर्तृत्ववान शिक्षकरत्न राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नागपूर येथे संपन्न झाला. यावेळी पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, रश्मीताई बर्वे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नागपूर तसेच शिक्षक नेते व संस्थापक अध्यक्ष मिलिंद वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यातील प्रतिभावान २२ शिक्षकांना यावेळी गौरविण्यात आले. रतीलाल बाबेल हे नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरात गेली २८ वर्षांपासून विज्ञान व गणित विषयांचे अध्यापन करीत आहेत. १०० टक्के निकालाची परंपरा त्यांनी आतापर्यंत जपली आहे. जिल्ह्यात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. विज्ञान संघामार्फत त्यांनी विज्ञान प्रसाराचे कार्य केले आहे. अनेक विद्यार्थांना राज्य शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन केले आहे. जुन्नर तालुका विज्ञान संघामार्फत त्यांनी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, शैक्षणिक सहलींचे आयोजन, ओझोन दिनानिमित्त निबंध, चित्रकला स्पर्धा घेतल्या आहेत. विज्ञान शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी म्हणून विज्ञानमित्र व विज्ञाननिष्ठ शिक्षक पुरस्कार देऊन अनेकांचा गौरव केला आहे.
240921\picsart_09-24-02.01.20.jpg
कॅप्शन - विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्रा.रतीलाल बाबेल यांना कर्तृत्ववान शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.