धनगरवाडी येथे पथनाट्यातून कोरोनाविषयी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:16+5:302021-07-18T04:08:16+5:30

खोडद : धनगरवाडी येथे आरोग्य खात्याच्या वतीने पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या ...

Awareness about Corona through street play at Dhangarwadi | धनगरवाडी येथे पथनाट्यातून कोरोनाविषयी जनजागृती

धनगरवाडी येथे पथनाट्यातून कोरोनाविषयी जनजागृती

Next

खोडद : धनगरवाडी येथे आरोग्य खात्याच्या वतीने पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमांतर्गत कोरोना विषयी जनजागृती करण्याची आली तसेच ४६ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्याची माहिती सरपंच महेश शेळके व उपसरपंच राजेंद्र शेळके यांनी दिली.

ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. तिसरी लाट येऊ नये यासाठी तयारी म्हणून अद्यापही करोनासंसर्ग, लसीकरण, आरटीपीसीआर,रॅपिड टेस्ट, लसीकरणाबाबत याबाबत समज - गैरसमज दूर करण्यासाठी पुणे जिल्ह्यात प्रथमच अशाप्रकारे पथनाट्य करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा यशस्वी प्रयत्न धनगरवाडी ग्रामपंचायतने केला आहे. प्राथमिक शिक्षक दुरगुडे यांनी स्व:लिखित कोरोनावरील कविता यावेळी सादर केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, वारूळवाडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा गुंजाळ, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे सरपंच महेश शेळके, उपसरपंच राजेंद्र शेळके, सोनल पवार, नयना कराळे, प्रियांका शेळके,राणी जाधव, प्राथमिक शाळा शिक्षक नीलेश ढवळे, राजेश दूरगुडे, घंगाळे मॅडम, मुख्याध्यापक अलका फाफाळे, आशा वर्कर अश्विनी पवार, अंगणवाडी सेविका, मदतनीस ग्रा.प कर्मचारी, ग्रामसेविका ऊर्मिला चासकर व ग्रामस्थ उपस्थित होते. पथनाट्य सादरीकरण अभय वारुळे व त्यांच्या कलाकार टीम यांनी केले.

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत परिसरातील सर्वच व्यावसायिक,दुकानदार असे एकूण ४६ जणांची आरटीपीसीआर टेस्ट केली आहे. त्यांचे अहवाल दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. यामुळे करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मदत होणार आहे. पुढील काळात गावात कोरोनाचा संसर्ग कोणालाही होणार नाही, यासाठी सदैव सतर्क राहू."

- महेश शेळके, सरपंच, धनगरवाडी, ता. जुन्नर

" सध्या ग्रामीण भागात कोरोना संक्रमित रुग्ण पुन्हा आढळून येऊ लागले आहेत. कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. नागरिक पुन्हा निर्धास्त आणि निष्काळजी झालेले पाहायला मिळत आहेत. कोरोनामुळे झालेली अवस्था सगळ्यांनीच पाहिली आहे, आता आपण अधिक सतर्क राहून काळजी घ्यायला हवी. लग्न, वाढदिवस, पूजा आदी कार्यक्रम कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत करावेत."

डॉ. वर्षा गुंजाळ,वैद्यकीय अधिकारी

आरोग्य केंद्र वारूळवाडी, ता. जुन्नर

धनगरवाडी येथे आरोग्य विभागाच्या वतीने कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली.

Web Title: Awareness about Corona through street play at Dhangarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.